IPL 2025 – थला फॉर नो रिझन… 55 हजार पाण्यात गेले, CSK च्या कामगिरीवर बच्चे कंपनी नाराज; Video व्हायरल
पाच वेळा आयपीएलची चमचमती ट्रॉफी उंचावणाऱ्या CSK चा 18 व्या हंगामातील खेळ अगदीच सुमार आणि खराब राहिला आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर संघाला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. चेन्नईने सलग पाच सामने गमावले आहेत. त्याचबरोबर महेंद्र सिंग धोनीची बॅटही अद्याप म्यानातून बाहेर आलेली नाही. चेन्नईच्या आणि धोनीच्या सुमार कामगिरीवर बच्चे कंपनी चांगलीज नाराज झाली आहे. आमचे पैसे वाया गेले, थला फॉर नो रिझन असं म्हणत आपला राग त्यांनी व्यक्त केला आहे. त्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
चेन्नईच्या काही छोट्या चाहत्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये बच्चे कंपनी चेन्नईवर आणि विशेषकरून महेंद्र सिंग धोनीवर चांगलीच नाराज झाली आहे. “कोणीही CSK चा सामना पाहण्यासाठी जाऊ नका, आम्ही आमचे 55 ते 60 हजार रुपये वाया घालवले, थला फॉर नो रिझन.” अशा पद्धतीने आपला राग बच्चे कंपनीने व्यक्त केला आहे. त्याचबरोबर CSK चा सामना पाहण्यासाठी तुमचे पैसे वाया घालवू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
They’re fighting to troll Dhoni and Csk
Thala for no reason was personal pic.twitter.com/c39hcGAr7j
— – (@noworriesbehpy1) April 13, 2025
चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. त्यामुळे अनुभवी महेंद्र सिंग धोनीला पुन्हा एकदा चेन्नईच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. धोनीच्या नेतृत्वात मैदानात उतरलेल्या चेन्नईचा पहिल्यात सामन्यात KKR ने सुपडा साफ केला. 20 षटकांमध्ये चेन्नईची गाडी 103 धावांपर्यंत मजल मारण्यात यशस्वी ठरली. चेन्नईचे माफक आव्हान कोलकाताने 59 चेंडू शिल्लक असताना गाठले आणि चेन्नईने सलग पाचवा सामना गमावला. आयपीएलच्या इतिहासात चेन्नईचा खेळ पहिल्यांदाच इतका वाईट राहिला आहे. तसेच धोनीची कामगिरी सुद्धा प्रत्येक सामन्यात अत्यंत खराब राहिली आहे. त्यामुळे त्याच्यावर सुद्धा सर्व स्तरातून टीका केली जात आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List