Skin Care Tips- त्वचेला चमकदार बनवण्यासाठी ओट्स आहे सर्वात बेस्ट पर्याय, कसा वापर कराल जाणून घ्या

Skin Care Tips- त्वचेला चमकदार बनवण्यासाठी ओट्स आहे सर्वात बेस्ट पर्याय, कसा वापर कराल जाणून घ्या

ओट्स आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. पण त्यात असे अनेक गुणधर्म आहेत जे तुमच्या त्वचेच्या सर्व समस्या सोडवू शकतात. ओट्समधील अनेक गुणधर्म आपल्याला दिवसभर उर्जा देतात. तसेच ओट्स केवळ आरोग्यासाठीच नाही तर, त्वचेसाठीही खूप उपयुक्त मानले जातात. ओट्समध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेला मुरुमांपासून खाज सुटण्यापर्यंतच्या सर्व समस्यांपासून आराम देतात.

 आपली त्वचा अनेकदा काळी पडू लागते, त्वचा काळी पडू लागणं म्हणजे आपल्या त्वचेतील मेलेनिनची पातळी असंतुलित होत असते. ओट्स हे व्हिटॅमिन सीचे समृद्ध स्रोत आहे जे मेलेनिन संतुलित करते आणि काळ्या त्वचेला गोरे बनवते. हे वापरण्यासाठी, एक चमचा मध आणि एक चमचा ओट्सचे पीठ लागेल. दोन्ही गोष्टी नीट मिक्स करुन त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावावी. हा पॅक सुकल्यानंतर, कोमट पाण्याने धुवावा. दररोज असे केल्याने त्वचेचा रंग पुन्हा गोरा होऊ लागेल.

 

 

 

ओट्समध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे त्वचेला मुरुमांपासून वाचवतात. ते वापरण्यासाठी, प्रथम दोन चमचे ओट्स, एक चमचा बेकिंग सोडा आणि पाणी घ्या. आता ओट्स बारीक करा आणि त्यात बेकिंग सोडा आणि पाणी घालून पेस्ट बनवा. ही पेस्ट मानेपासून चेहऱ्यापर्यंत संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या.  सुकल्यानंतर, थंड पाण्याने तोंड धुवा.

 

 

 

त्वचा कोरडी असेल तर खाज सुटण्याची समस्या उद्भवते. पण ओट्स वापरून  या समस्येचा सामना करू शकता. ओट्समध्ये असे अनेक गुणधर्म असतात जे त्वचेला बॅक्टेरियापासून वाचवतात आणि खाज सुटण्याच्या समस्येपासून आराम देतात. याकरता, अर्धा कप ओट्स, एक अंडे, एक मॅश केलेले केळे, एक चमचा मध आणि एक चमचा बदाम तेल लागेल. या सर्व गोष्टी मिसळून पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. सुकल्यानंतर, कोमट पाण्याने तोंड धुवावे.

ओट्स त्वचेला चांगले मॉइश्चरायझ करतात. यासाठी, सर्वप्रथम एका लिंबाचा रस, एक चमचा मध आणि एक चमचा ओट्सची आवश्यकता असेल. तिन्ही गोष्टी एकत्र करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. ते सुकू द्या आणि नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा.

 

ओट्स त्वचा स्वच्छ करते, म्हणून क्लिंजर म्हणून देखील वापरतात. यासाठी, एक कप ओट्समध्ये काही थेंब लैव्हेंडर तेल मिसळा आणि त्याद्वारे त्वचा स्वच्छ करा. ते काही काळ त्वचेवर राहू द्या. नंतर कोमट पाण्याने  चेहरा धुवावा.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान चीनचा अमेरिकेला मोठा धक्का, बोईंग जेटची डिलिव्हरी घेण्यास केला नकार; होणार मोठे नुकसान
चीनने आपल्या विमान कंपन्यांना अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंगकडून नवीन विमाने न घेण्याचे आदेश दिले आहेत. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, चीनने अमेरिकेत...
मनसे-शिवसेना युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे म्हणाले “आमचे विचार…”
ब्रिटनमध्ये कोरोनाच्या प्रकरणांमध्ये अचानक वाढ, नवीन प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
शरीर सुखासाठी विवाहित महिला झाली वेडिपिशी, मुलांसमोर बॉयफ्रेंडसोबत केले नको ते कृत्य
KKR Vs PBKS – चतुर ‘चहल’ला यान्सनची साथ; कोलकाता 100 च्या आत ढुस्स, पंजाबचा 16 धावांनी विजय
वानखेडे स्टेडियमवर आता शरद पवार स्टँड, MCA चा मोठा निर्णय
Photo – नाशकात भगवे वादळ! शिवसेनेच्या निर्धार शिबीरासाठी नाशिक सज्ज