सुरेश ठुकरूल यांच्या निरोप समारंभात पत्रकार संघाच्या आठवणींना उजाळा
मुंबई मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ कर्मचारी सुरेश ठुकरूल 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कौटुंबिक सोहळ्यात सुरेश ठुकरूल यांच्याबाबत विविध मान्यवरांनी सांगितलेल्या आठवणींमुळे पत्रकार संघाच्या वैभवशाली आठवणींना उजाळा मिळाला.
सुरेश ठुकरूल यांच्या निरोप समारंभाला पत्रकारितेतील दिग्गज उपस्थित होते. पत्रकार संघाच्या कार्यकारिणीतर्फे तसेच माजी अध्यक्ष आणि माजी विश्वस्त यांजकडून 33 हजार रुपयांचा निधी ठुकरूल यांना प्रदान करण्यात आला. तसेच गौरवनिधी उभारण्याचा संकल्पही पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी यावेळी जाहीर केला.
‘सुरेश ठुकरूल या कर्मचाऱयांचा कौतुक सोहळा ज्या थाटामाटात मुंबई मराठी पत्रकार संघाने आयोजित केला, ही बाब राज्यातील सर्वच पत्रकार संघासाठी आदर्शवत आहे,’ अशा शब्दात माजी मंत्री महादेव जानकर यांनी या सोहळ्याचे वर्णन केले.
मुंबई मराठी पत्रकार संघाने जो माझा कौतुक सोहळा आयोजित केला आहे, त्यासाठी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकारिणीचे ऋण मी आयुष्यात विसरू शकणार नाही. पत्रकार संघाचा कर्मचारी ही ओळख मी आयुष्यभर अभिमानाने मिरवली, असे सत्काराला उत्तर देताना सुरेश ठुकरूल म्हणाले.
सुरेश ठुकरूल यांच्या निवृत्ती सोहळ्यासाठी उपाध्यक्षा स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे, कोषाध्यक्ष जगदीश भोवड, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, दिवाकर शेजवळ, विजय तारी, घनःश्याम भडेकर, प्रदीप कोचरेकर, रवींद्र खांडेकर, सदानंद खोपकर, आत्माराम नाटेकर, गजानन सावंत, राजेश खाडे, विनोद साळवी, हेमंत सामंत, राजेश माळकर, आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List