काँग्रेसने मुस्लिमाला पक्षाचा अध्यक्ष बनवून दाखवावे – नरेंद्र मोदी
काँग्रेस पक्षाला मुस्लिमांबद्दल थोडीशीही सहानुभूती असेल तर त्यांनी एका मुस्लिमाला त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष बनवून दाखवावे. परंतु, त्यांचे नेते असे काहीही करणार नाहीत. त्यांना केवळ देशातील नागरिकांचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. हरयाणात विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
2013 मध्ये काँग्रेसने निवडणुकीत मतदान करता यावे म्हणून कायद्यात सुधारणा केली. हा कायदा अशा प्रकारे बनवण्यात आला की बाबासाहेबांचे संविधान उद्ध्वस्त झाले. जर त्याचा योग्य वापर केला असता तर मुस्लिमांना पंक्चर बनवत राहण्याची गरज पडली नसती, असेही मोदी म्हणाले. काँग्रेस संविधानाचा नाश करणारी असून कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एससी, एसटी, ओबीसींचे पेन्शनमधील अधिकार हिसकावून घेतले आणि धर्माच्या आधारावर आरक्षण दिले, असा आरोपही त्यांनी केला.
भाजप आणि आरएसएसने आंबेडकरांचा अवमान केला -खरगे
मोदी सरकार केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव घेते. परंतु, भाजप आणि आरएसएसचे लोक आंबेडकर यांचे विरोधक आहेत. भाजपाचे वैचारिक पूर्वज बाबासाहेबांच्या निवडणूक हरण्याला जबाबदार होते, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष खरगे यांनी मोदींना प्रत्युत्तर देताना केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List