CSK Vs LSG – खलील अहमदने पहिल्याच षटकात विकेट घेतं विक्रमाला घातली गवसणी
चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघांमध्ये उत्तर प्रदेशातील एकाना क्रिकेट स्टेडियमवर सामना खेळला जात आहे. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या 12 षटकांचा खेळ संपला असून लखनौने 3 गड्यांच्या मोबदल्यात 100 धावा केल्या आहेत. सामन्याच्या पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज खलिल अहमदने अचूक मारा करत लखनौला मार्क्रमच्या स्वरुपात पहिलाच हादरा दिला. याच विकेटसह त्याने जोफ्रा आर्चरचा विक्रम मोडीत काढला आहे.
खलील अहमद आयपीएलच्या 18 व्या हंगामता पहिल्याच षटकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत पहिल्या षटकात सर्वाधिक 4 विकेट घेतल्या आहेत. या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर जोफ्रा आर्चर (3 विकेट), ट्रेंट बोल्ट (2 विकेट), शार्दुल ठाकूर (2 विकेट) आणि मोहम्मद सिराज (2 विकेट) यांचा समावेश आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List