बीडपेक्षा सिंधुदुर्गची अवस्था भयानक; कुडाळमध्ये तरुणाला नग्न करून अमानुष हत्या, खुनी नराधम मिंधे गटाचे पदाधिकारी
बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने महाराष्ट्र हादरला होता. बीडपेक्षाही सिंधुदुर्गची अवस्था भयानक आहे. तेथील कुडाळमध्ये सिद्धिविनायक ऊर्फ प्रकाश बिडवलकर या 35 वर्षीय तरुणाचे अपहरण करून अमानुष हत्या झाल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. मारेकऱयांनी प्रकाशला नग्न करून त्याचे मोबाईल फोनवर व्हिडीओ काढले आणि नंतर लाथाबुक्क्यांनी निर्दयपणे तुडवून ठार मारले. मारहाण करताना मोबाईलवर फोचो काढले आणि शूटिंगही केल्याचे सांगण्यात येते. या घटनेतील मारेकरीही सत्ताधारी पक्षाशी संबंधित असून ते मिंधे गटाचे कार्यकर्ते आहेत. हत्या केल्यानंतर प्रकाशचा मृतदेह जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाला होता.
प्रकाश बिडवलकर हा कुडाळ तालुक्यातील चेंदवण नाईकवाडी येथील रहिवासी होता. दोन वर्षांपूर्वी 2023 मध्ये त्याचे अपहरण करून हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मिंधे गटाचा कार्यकर्ता सिद्धेश शिरसाटसह गणेश कृष्णा नार्वेकर (33, रा. माणगाव), सर्वेश भास्कर केरकर (29, रा. सातार्डा, ता. सावंतवाडी) आणि अमोल ऊर्फ वल्लभ श्रीरंग शिरसाट (रा. पिंगुळी, ता. कुडाळ) अशा चार जणांना निवती पोलिसांनी अटक केली आहे.
वाल्मीक कराड होणार असल्याचे जाणवताच आरोपींची प्रकृती बिघडली
प्रकाश याची हत्या केल्यानंतर आरोपींनी त्याचा मृतदेह कुडाळवरून सातार्डा येथे नेला आणि जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही केला होता. या चारही आरोपींना कुडाळ न्यायालयाने 13 एप्रिलपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपताच त्यांना रविवारी 13 एप्रिल रोजी कुडाळ न्यायालयात हजार केले गेले. न्यायालयाने 15 एप्रिलपर्यंत वाढवून दिली तर चौथा आरोपी अमोल शिरसाट याला वैद्यकीय कारणास्तव न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सिद्धेश शिरसाट याची प्रकृती बिघडल्याने त्यालाही उपचारासाठी तात्पुरती न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
हत्या केल्यानंतर मृतदेह जाळण्यासाठी कुडाळहून साताडर्य़ाला नेला
या हत्या प्रकरणात दोन वाहनांचा वापर झाला होता. त्यापैकी प्रकाश बिडवलकर याला मारहाण करून त्याचा मृतदेह कुडाळवरून चेंदवण येथे नेण्यासाठी आरोपींनी ज्या वाहनाचा वापर केला ते वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे तर कुडाळ ते सातार्डापर्यंत मृतदेह ज्या गाडीतून नेला ती गाडी अद्याप उपलब्ध झालेली नाही. पोलिसांच्या कारवाईची कुणकुण लागताच सिद्धेश हा कोल्हापूर येथे गेला होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले तेव्हा त्याने त्याचा मोबाईल फोन नातेवाईकाकडे दिला. त्या फोनमध्येच प्रकाश बिडवलकर याला मारहाण करतानाचे व्हिडीओ आहेत. त्या मोबाईल फोनचा शोध सुरू आहे असे पोलीस अंमलदार भीमसेन गायकवाड यांनी सांगितले.
सिद्धेश शिरसाटचा आका कोण? शिवसेनेच्या वैभव नाईक यांचा सवाल
प्रकाश बिडवलकर यांची निर्घृण हत्या करणाऱ्या सिद्धेश शिरसाटचा आका कोण आहे? असा प्रश्न कुडाळमधील शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, ‘बीड जिह्यापेक्षा सिंधुदुर्ग जिह्यात दहशतीची मोठी परिस्थिती निर्माण झाली असून कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. फक्त 22 हजार रुपयांसाठी मिंधे गटाचा पदाधिकारी सिद्धेश शिरसाट याने प्रकाशला जीव जाईपर्यंत मारहाण केली. तत्पूर्वी त्याला नग्न करून त्याचे मोबाईलवर शूटिंग केले. सिध्देश शिरसाटला वाचवण्यासाठी स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी जिह्यातील प्रमुख पोलीस अधिकाऱयांना पह्न केले आहेत. त्यामुळे या सिद्धेश शिरसाटचा खरा आका कोण, असा प्रश्न सिंधुदुर्गवासीयांना पडला आहे. पोलिसांनी त्याला मदत करणाऱया सगळय़ांचा तपास केला पाहिजे. तसेच जे कोणी या तपासात दबाव निर्माण करत आहेत, त्यांची नावे जाहीर झाली पाहिजेत.’
प्रकाश बिडवलकर याची निर्घृण हत्या करणाऱया सिद्धेश शिरसाटचा ‘आका’ कोण आहे, असा प्रश्न कुडाळमधील शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List