वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एआयएडीएमकेशी तामीळनाडूत कमळाबाईची चुम्माचुम्मी!

वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या एआयएडीएमकेशी तामीळनाडूत कमळाबाईची चुम्माचुम्मी!

वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात बोलणाऱ्यांवर हिंदुत्व सोडल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून केला जात आहे. त्याच कमळाबाईने आता वक्फ विधेयकाच्या विरोधात संसदेत मतदान करणाऱ्या एआयएडीएमकेशी तामीळनाडूत चुम्माचुम्मी सुरू केली आहे.

राज्यसभेत एआयएडीएमके सदस्यांनी वक्फ सुधारणा विधेयकाच्या विरोधात मतदान केले. यावेळी थंबीदुराई यांनी अल्पसंख्याकांच्या कल्याणासाठी आपला पक्ष वचनबद्ध असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच देशात विशेषतः तामीळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये मुस्लिम आणि मुस्लिम नेत्यांची लोकसंख्या खूप जास्त आहे. अल्पसंख्याकांचे हित जपले जावे अशी एआयएडीएमकेची इच्छा असल्याचे थंबीदुराई म्हणाले होते. मुस्लिमांची उघडपणे पाठराखण करणारा एआयएडीएमके मित्रपक्ष म्हणून भाजपला कसा चालतो, असा प्रश्न केला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे, एआयएडीएमकेने तामीळनाडू विधानसभेत मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी मंजूर केलेल्या ठरावाच्या बाजूने मतदान केले होते, ज्यामध्ये विधेयक मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. भाजपविरोधात पेंद्रात आणि राज्यात भूमिका घेणाऱया एआयएडीएमकेसोबत कमळाबाईने आपल्या राजकीय स्वार्थासाठी चुम्माचुम्मी सुरू केली आहे.

मुस्लिम आरक्षणाचा समर्थन

तामीळनाडूच्या माजी मुख्यमंत्री एमजीआर आणि जे जयललिता आणि सध्याचे पक्षाचे सरचिटणीस एडाप्पाडी के पलानीस्वामी यांनी अल्पसंख्याकांसाठी अनेक कल्याणकारी कार्यक्रम सुरू केले होते. मुस्लिम आरक्षणाचे देखील एआयडीएमकेकडून समर्थन करण्यात आले होते.

एआयडीएमकेचा हिंदीला विरोध, तरीही सोबत

केंद्र सरकारकडून त्रिसूत्री भाषा रचनेच्या माध्यमातून दक्षिणेकडील राज्यांत हिंदी भाषेचा आग्रह धरला जात आहे. तामीळनाडूसह दक्षिणेकडील राज्यांतून यास कडाडून विरोध होत आहे. एआयडीएमकेने कोणत्याही परिस्थतीत हिंदीचे आक्रमण सहन करणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यानंतरही भाजपने एआयडीएमकेशी हातमिळवणी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

एसटीच्या अस्वच्छ हॉटेल थांब्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश जारी एसटीच्या अस्वच्छ हॉटेल थांब्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश जारी
एसटीच्या प्रवासादरम्यान एसटी बसेसना ठराविक थांबे दिलेले असतात. या थांब्यातील हॉटेलात अगदी बेचव आणि महागडे जेवण प्रवाशांच्या माथी मारले जात...
यंदाचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर
उन्हाळ्यात मधुमेही रुग्ण उसाचा रस पिऊ शकतात का? तज्ञ काय सांगतात ?
शाहरुख खानच्या बंगल्यात मुक्काम करण्याची संधी; मिळेल सुपरस्टारसारखा अनुभव, एका दिवसाचे भाडे किती?
40व्या वर्षी सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी शरीरासाठी स्वयंपाकघरातील ‘हा’ पदार्थ ठरेल फायदेशीर….
मधुमेही रूग्ण दूध पिऊ शकतात का? जाणून घ्या काय सांगतात तज्ञ
दंगलींच्या आडून महाराष्ट्र लुटण्याचे षडयंत्र, राज्यात शांतता नांदावी यासाठी सद्भावना यात्रेची गरज – हर्षवर्धन सपकाळ