Photo – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभुमीवर अनुयायांची तुफान गर्दी

Photo – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभुमीवर अनुयायांची तुफान गर्दी

हिंदुस्थानी राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त दादरच्या चैत्यभूमी आणि बाबासाहेबांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांची मोठी गर्दी उसळली आहे.

(सर्व फोटो – रुपेश जाधव)

 मुंबईतूनच नव्हे तर राज्यभरातून हजारोंच्या संख्येने अनुयायी दादरमध्ये दाखलं झाले आहेत.

त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन महापालिकेच्या जनसंपर्क विभागाद्वारे करण्यात आले आहे.

या प्रदर्शन दालनात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासातील दुर्मिळ छायाचित्रे आहेत.

या प्रदर्शन दालनात, संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरक जीवनचरित्रावर आधारित कॉफी टेबल बुकदेखील विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. 

चैत्यभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक तसेच परिसरामध्ये नियंत्रण कक्ष, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहे, शौचालये आदी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

त्यासोबतच सीसीटीव्ही, चैत्यभूमीजवळ समुद्रात जीवरक्षक बोटी, अग्निशमन दलाचे पथक तैनात करण्यात आले आहे.

वैद्यकीय सुविधेसाठी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आणीबाणीच्या प्रसंगासाठी रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News