राजेंद्र घनवट यांनी ११ शेतकऱ्यांची फसवणूक केली, अंजली दमानिया यांचा आरोप
एका डिबेटमध्ये आपण राजेंद्र घनवट यांचे नाव घेतले तर काही शेतकरी माझ्याघरी आले. त्यांचा राजेंद्र घनवट यांनी छळ केल्याचा आरोप त्यांनी माझ्याशी बोलताना केला आहे. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीयल सर्व्हीसेसमध्ये राजश्री धनंजय मुंडे आणि राजेंद्र पोपटलाल घनवट हे दोघे डायरेक्टर आहेत. राजश्री धनंजय मुंडे , राजेंद्र घनवट आजतागायत डायरेक्टर म्हणून आहेत. यांनी ११ शेतकऱ्याची फसवणूक केलीआहे. त्यांना छळून २० कोटींची जमीनीचा ८ लाखांत व्यवहार केल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे.
मिराताई आणि इतर शेतकऱ्यांचा छळ केला गेला आहे. मिरा सोनावणे यांच्या घरचे १९५७ मध्ये मृत पावले, पण २००७ मध्ये त्यांच्या नावे व्यवहार केला गेला आहे. तक्रार करायला गेले तर त्यांना अपशब्द वापरले, मानहानीचे, ३०७ चे गुन्हे दाखल केले आहेत. एक जण पीएसआय आहे, न्याय मागणाऱ्या अशा लोकांवरच अफाट गुन्हे दाखल केले आहेत.
खोटे गुन्हे दाखल करून जेरीस आणलं
पोपटलाल घनवट यांना आव्हान माझे आहे की त्यांनी वाटेल तेवढे मानहानीचे गुन्हे दाखल करावे, पण त्यांचा पर्दाफाश होणारच. गृहमंत्र्यांकडे आपण कारवाईची मागणी करणार आहे. बावनकुळे यांच्याकडे या सगळ्या लोकांना पाठवणार आहे. या सगळ्यांवर सक्त कारवाई झालीच पाहीजे अशी मागणी आपण केल्याचे अंजली दमानिया यांनी म्हटले आहे. धनंजय मुंडे यांच्याशी या सगळ्यांचे लागेबांधे आहेत
घनवटमुळे अनेकांचं आयुष्य उदध्वस्त
या संदर्भात मिराताई सोनावणे म्हणाल्या की आम्ही अंजली दमानिया यांच्याकडे आलो आहोत. खेडमध्ये पोपटलाल घनवट यांची दहशत आहे.आमच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. शंकर मारूती रौंदळ यांच्याकडे जमीन गहाण ठेवली होती, पण वडिलांनी खरेदी खत करून घेतलं, वयाच्या ९ व्या वर्षी तमाशात काम केलं, लहानपणी भिक मागितली पण आम्हाला कोर्टात खेचलं. आमचे जमिनीसाठी हाल केले. पोपट घनवट, राज घनवट यांनी आमचे हाल केले. पोपट घनवट समोर येत नाही. ताई आमच्यावर अन्याय होतोय, आमची वाईट अवस्था आहे. घनवटमुळे अनेकांचं आयुष्य उदध्वस्त झाल्याचे मिराताई सोनवणे यांनी म्हटले आहे.
१० वर्षे झाले आम्ही तिथे जाऊ शकत नाही
पोपट घनवट याने वडिलांना धमकी दिली. २० मिनिटांत त्यांना हार्ट अटॅक आला. तुझ्या वडिलांनी जमीन विकली सही कर असे ते म्हणाले . बंदुकीचा धाक दाखवला. कोर्टातून कारवाई होणार , मी कोर्टामार्फत लेटर पाठवलं आहे , १० वर्षे झाले आम्ही तिथे जाऊ शकत नाही असे राजेंद्र सोनावणे यांनी सांगितले.
दमानिया यावेळी म्हणाल्या की सामान्यांना जगणं मुश्किल झालंय,पोलिसांना धनंजय मुंडेकडून फोन येतात. चंद्रशेखर बावनकुळे आणि अजित पवार यांना विनंती की तात्काळ कारवाई करावी असेही दमानिया यांनी सांगितले. पहिल्याच दिवशी राजेंद्र घनवट यांनी पंकजा मुंडे यांच्या फाईल्स माझ्याकडे पाठवल्या होत्या असेही त्या म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List