दाऊद इब्राहिमचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा चर्चेत, 32 वर्षानंतर मुंबईतील टाडा कोर्टाचा नवीन आदेश?

दाऊद इब्राहिमचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा चर्चेत, 32 वर्षानंतर मुंबईतील टाडा कोर्टाचा नवीन आदेश?

Tiger Memon Mumbai Blast Case: मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी दाऊद इब्राहिमचा उजवा हात टायगर मेमन पुन्हा चर्चेत आला आहे. त्याच्यासंदर्भात मुंबईतील टाडा न्यायालयाने महत्वाचा आदेश दिला आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा मास्टरमाइंड टायगर मेमन, त्याचा भाऊ याकूब मेमन आणि मेमन परिवारशी संबंधित 14 अचल संपत्ती जप्त करुन केंद्र सरकारला देण्याचे आदेश टाडा कोर्टाने दिले आहे. त्यात दुकाने, फ्लॅट, कार्यालये आणि रिकामे प्लॉट आहे. ही संपत्ती मुंबईतील उच्चभ्रू भाग असलेला वांद्रे येथील अलमेडा पार्क, सांताक्रूज, कुर्ला आणि माहीममध्ये आहे. 1994 मध्ये ही संपत्ती जप्त करण्यात आली होती.

1994 मध्ये संपत्ती जप्त

टाडा कोर्टाचे विशेष न्यायाधीश व्ही.डी. केदार यांनी हा आदेश दिला. त्यांनी म्हटले की, कोर्ट रिसीव्हरकडे असणारी ही संपत्ती केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. 1994 मध्ये केंद्र सरकारच्या विनंतीनंतर कोर्टाने ही संपत्ती जप्त केली होती. 1993 मधील स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स या कायद्यानुसार केंद्र सरकारने कोर्टात हे अपील केले होते. मेमन परिवाराने ही संपत्ती तस्करी आणि बेकायदेशीर कारवाईतून मिळवल्याचा दावा कोर्टात केंद्र सरकारने केला होता. या संपत्तीत वांद्रे येथील अलमेडा पार्क येथील एक फ्लॅट, सांताक्रूजमधील एक रिकामा प्लॉट आणि एक फ्लॅट, कुर्लामधील ऑफिस, माहीममधील दुकाने आणि गॅरेज आहे.

कोर्टाने पाठवली होती नोटीस

संपत्तीच्या मालकात टायगर मेमन, याकूब मेमन, अब्दुल रजाक मेमन, एसा मेमन, यूसुफ मेमन आणि रुबीना मेमन यांचा समावेश आहे. कोर्टाने ही संपत्ती विकून किंवा इतर कायदेशीर प्रक्रियेद्वारे त्याची किंमत अन् खर्च वसूल करण्यात यावा, असे म्हटले आहे. टाडा कोर्टने ही संपत्ती केंद्र सरकारकडे देण्याच्या आदेश देण्यापूर्वी मेमन परिवारला नोटीस पाठवून उत्तर मागितले होते. परंतु टायगर मेमन आणि अन्य परिवाराकडून काहीच उत्तर आले नाही. टायगर मेमन अजूनही फरार आहे. त्याचा भाऊ याकूब मेमन याला 2015 मध्ये फाशी दिली गेली. परिवारातील इतर सदस्य अब्दुल रजाक मेमन, हनीफा मेमन यांनी या नोटीसला काहीच उत्तर दिले नाही. कोर्टाला उत्तर न मिळाल्यामुळे ही संपत्ती जप्त करण्यात आली आहे.

मेमन परिवाराची ही संपत्ती मुंबई उच्च न्यायालयाचे रिसीव्हर केंद्र सरकारला देणार आहे. सरकार ही संपत्ती विकेल किंवा इतर कायदेशीर मार्गाचा अवलंबन करेल. मेमन कुटुंबाने मुंबईत रिअल इस्टेट क्षेत्रात मोठे साम्राज्य उभे केले होते. त्यांच्याकडे कोट्यवधींची मालमत्ता होती. पण 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर टायगर मेमन फरार झाला. त्यानंतर ही संपत्ती जप्त करण्यात आली.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल मी जरी डॉक्टर नसलो तरी कोणाच्या मानेचा पट्टा…., एकनाथ शिंदेंचा पुन्हा नाव न घेता ठाकरेंवर हल्लाबोल
माजी आरोग्य मंत्री आणि कुपोषण टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. दीपक सावंत यांना कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाच्या वतीनं पी. एच. डी. प्रदान...
छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
Mumbai Local – कुर्ला स्टेशनवर पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या लोकलमधून धूर, प्रवाशांची धावाधाव
लालू प्रसाद यादव यांची तब्येत बिघडली, उपचारासाठी दिल्लीला रवाना
मध्य प्रदेशमध्ये दोन महिला माओवाद्यांचा खात्मा, दोघींच्या डोक्यावर होते प्रत्येकी 14 लाखांचे बक्षिस
IPL 2025 – राजस्थान विजयी ट्रॅकवर परतणार? दमदार यष्टीरक्षकाचं होणार पुनरागमन
BSNL ने 1,757 कोटी रुपयांवर पाणी सोडलं? कॅगच्या अहवालातून मोठा घोळ उघड