दोन वर्षांत 28 हजार स्टार्टअप शटडाऊन
दोन वर्षांत 28 हजारांहून अधिक स्टार्टअप बंद झाले आहेत. 2023 मध्ये 15,921, तर 2024 मध्ये 12717 स्टार्टअप बंद झाले. जे वर्षभरात सक्रिय नाहीत किंवा दिवाळखोरीत गेलेत, अशा स्टार्टअपचा यामध्ये समावेश आहे. 2025 मध्ये स्टार्टअप शटडाऊनची संख्या फक्त 259 आहे. ही संख्या वाढू शकते, असे तज्ञांचे म्हणणे आहे. 2019 आणि 2022 दरम्यान वर्षाला साधारण 9600 पेक्षा अधिक स्टार्टअप सुरू व्हायचे. मात्र 2024 साली ही संख्या कमी होऊन 5264 वर आली. या वर्षी तर आतापर्यंत फक्त 125 स्टार्टअप सुरू झाले. स्टार्टअ पची संख्या ऍग्रीटेक, फिनटेक, एडटेक, हेल्थटेक या क्षेत्रांत घटली. ग्राहकांची संख्या कमी झाल्यावर खर्च वाढत राहिला. त्यातून स्टार्टअप बंद करण्याची वेळ आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List