Breaking : गद्दार गीत प्रकरणी हायकोर्टाचा कुणाल कामराला मोठा दिलासा, अटकेपासून संरक्षण
कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विंडबन गीत सादर केलं होतं. या प्रकरणी खार पोलिसांत कामराविरोधात गुन्हा दाखल झाला होता. आता हायकोर्टाने कामराला अटक करण्याला नकार दिला आहे.
न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठाने राखून ठेवलेला निकाल आज जाहीर केला. त्यानुसार पोलीस कामराला चौकशी दरम्यान अटक करू शकत नाही असे कोर्टाने म्हटले आहे. तसेच कुणाल कामराची चौकशी करायची असेल तर पोलिसांनी चेन्नईला जाऊन चौकशी करावी असे म्हटले आहे. तसेच चौकशीसाठी रीतसर कुणालला नोटीस पाठवावी असेही कोर्टाने म्हटले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List