Pahalgam Attack – पाकड्यांची तळी उचलणं भोवलं, 3 वेळच्या आमदाराला पोलिसांनी उचललं; देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण असून पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी होत आहे. एकीकडे देशभरातून संपात व्यक्त होत असताना दुसरीकडे पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या एका आमदाराला आसाममधून अटक करण्यात आली आहे. आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट (एआययूडीएफ) या पक्षाचे आमदार अमिनूल इस्लाम यांना पाकिस्तानची तळी उचलणे भोवले असून त्यांना देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली.
अमिनूल इस्लाम हे आसामच्या धिंग मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांनी एक व्हिडीओ जारी करत पाकिस्तानचे समर्थन केले होते. याची दखल घेत पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भादवि कलम 152, 196, 197(1), 113(3), 352 आणि 353 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून इस्लाम यांना नागाव जिल्ह्यातील त्यांच्या निवासस्थानातून अटक केली. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाईल.
दरम्यान, आमदाराच्या विधानावर एआययूडीएफनेही प्रतिक्रिया दिली असून हे त्यांचे वैयक्तिक विचार असून पक्षाचे नाही, असे म्हणत हात झटकले आहेत. अनिमूल इस्लाम यांनी केलेले विधान दुर्दैवी आहे. आताची वेळ सरकारसोबत उभे राहण्याची आहे. दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. दहशतवादी इस्लामला बदनाम करत आहेत, असे म्हणत एआययूडीएफचे अध्यक्ष बद्रुद्दीन अजमल यांना पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध केला.
पूरन सिंह निघाला मनीर हुसैन, वैष्णो देवी मार्गावर खोट्या कागदपत्रांसह खेचर सेवा देणाऱ्या दोघांना अटक
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List