गुजरातच्या ‘पृथ्वी’ची 11.51 लाखांत विक्री
गुजरात राज्यातील काठियावाडी येथील घोडय़ांची मागणी वाढली आहे. बिहारमधील एका खरेदीदाराने पृथ्वी नावाचा घोडा 11.51 लाख रुपये देऊन खरेदी केला आहे. हा घोडा जुनागढच्या राजुभाई राडा यांच्या मालकीचा होता. राजूभाई यांच्याकडे वडिलोपार्जित काठियावाडी जातीचे अनेक घोडे आहेत. यातील पृथ्वी नावाचा घोडा त्यांनी साडेअकरा लाखांत विकला आहे. बिहारच्या पटणा येथील खरेदीदाराने या घोडय़ाला गुजरातहून बिहारला नेण्यासाठी खास रुग्णवाहिका मागवली आहे. घोडय़ाला बिहारला पोहोचण्यासाठी चार दिवस लागणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List