Raw Milk For Skin- चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी कच्चे दूध आहे खूप फायदेशीर, वाचा सविस्तर
On
आपल्या चेहऱ्याचे पोषण करण्यासाठी कच्चे दूध हे पोषक असल्याचे म्हटले जाते. त्वचेसाठी कच्चे दूध हा एक उत्तम सौंदर्यासाठी पर्याय मानला जातो. मुख्य म्हणजे कच्चे दूध चेहऱ्यावर लावण्याचे एक नाही तर खूप सारे फायदे आहेत. त्वचेच्या योग्य काळजीसाठी कच्चे दूध हे फायदेशीर मानले जाते. कच्चे दूध हे त्वचेसाठी सर्वोत्तम घरगुती उपचारांपैकी एक म्हणून ओळखले जाते.
कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने काळे डागही कमी होतात. दुधात जीवनसत्त्वे, बायोटिन, लैक्टिक ऍसिड, मॅग्नेशियम, प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. विशेष म्हणजे दूध फक्त पिण्यासाठीच नाही तर, त्वचेसाठी सुद्धा उत्तम मानले जाते. तजेलदार त्वचा हवी असल्यास कच्चे दूध हा एकमेव उत्तम पर्याय मानला जातो.
कच्चे दूध चेहऱ्यावर लावण्याचे काय होतील फायदे?
दुधामध्ये असलेले जीवनसत्त्व अ आणि ब हे वृद्धत्वविरोधी घटक म्हणून काम करतात. दुधाचा मसाज केल्यास चेहऱ्यावरील सुरकुत्या या कमी व्हायला मदत होते. तसेच चेहऱ्याला चकाकी आणण्यासाठी कच्चे दूध हे फार उपयुक्त आहे.धूळ आणि प्रदूषणामुळे आपल्या चेहऱ्याचा तजेला निघून जातो. ही मृत त्वचा घालवण्यासाठी आणि चमकदार चेहरा होण्यासाठी कच्चे दूध हा एक उत्तम पर्याय आहे.
कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्यामुळे, चेहऱ्यावरील डेड स्किन निघून जाण्यास मदत होते. तसेच चेहऱ्यावर एक अनोखी चमक कच्च्या दुधामुळे येते. पण याकरता आपल्याला रोज किमान पाच मिनिटे कच्चे दूध चेहऱ्यावर लावून ठेवणे आवश्यक आहे.

कच्चे दूध हे त्वचेला हायड्रेट करण्याचे उत्तम कार्य करते. कच्चे दूध लावल्यानंतर, त्वचेला आराम मिळतो आणि त्वचा एकदम फ्रेश दिसू लागते.तेलकट त्वचेमुळे चेहऱ्यावर मुरुमे येण्याची दाट शक्यता असते. म्हणून तेलकट त्वचेसाठी कच्च्या दूधाने चेहऱ्याला मसाज करणे हे खूप गरजेचे मानले जाते. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे जाण्यास मदत होते.
बऱ्याचजणांच्या चेहऱ्यावर काळे चट्टे आणि डाग असतात. या डागांवर नियमितपणे कच्च्या दुधाने मसाज केल्यास, हे डाग विरळ होतात.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. )
Tags:
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News
18 Apr 2025 12:07:06
“तुम्ही तुमच्या मंदिराच्या ट्रस्टमध्ये बिगर हिंदूला सदस्य बनवणार का? हा सुप्रीम कोर्टाचा प्रश्नच एकदम चुकीचा आहे. कारण असं आहे की,...
Comment List