खासगी शिक्षणसंस्थामंध्ये हवंय आरक्षण, गुजरातमध्ये झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत ठराव मंजूर
गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक पार पाडली. खासगी शिक्षणसंस्थांमध्येसुद्धा आरक्षण हवंय असा ठराव काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठकीत मंजूर करण्यात आला.
काँग्रेस कार्यकारिणी समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी सामाजित न्यायाचा मुद्दा उपस्थित केला. ओबीसी वर्गात पोहोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. मुस्लिम समाजाबाबत मुद्दे मांडताना घाबरू नका असेही राहुल गांधी म्हणाले. ओबीसींसाठी लढण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मागे पुढे बघू नका असे म्हणत काँग्रेस पक्षाने खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण हवंय असा ठराव मंजूर केला.
मागास आणि अति मागास समाजाशी संपर्क साधल्यास उत्तर प्रदेश काँग्रेसचा विजय होईल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनसारखे शब्द वापरताना घाबरू नका असेही राहुल गांधी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List