Summer Drink- उन्हाळ्यात घरी बेलाचे सरबत बनवताना या 4 महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा
उन्हाळ्यात सरबत पिण्याचं प्रमाण वाढतं. उन्हाळ्यात विविध प्रकारचे ज्यूस, शेक आणि स्मूदी आपण घरबसल्या बनवू शकतो. थंड गोष्टी प्यायल्याबरोबर तुमच्या शरीरात थंडावा जाणवू लागतो. कडक उन्हातून घरी आल्यानंतर, जर तुम्हाला एक ग्लास थंडगार पदार्थ मिळाला तर तो सर्व थकवा दूर करतो आणि शरीरालाही गारवा मिळतो.
उन्हाळ्यात मिळणाऱ्या एका प्रसिद्ध, आरोग्यदायी आणि अद्भुत सरबत आपण पाहणार आहोत. उन्हाळ्यात मिळणारे बेलफळात आरोग्याचा खजिना लपलेला आहे. औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेले बेलफळ हे पोटाशी संबंधित समस्यांवर रामबाण उपाय आहे.
बेलाचा रस- बेलाच रस बनवताना, नेहमी लक्षात ठेवा की बेल पूर्णपणे पिकलेले असावे. तरच सरबत चांगले होते, पिकलेल्या बेलाच्या रसात पुदिना आणि लिंबाचा रस घातला तर त्याची चव खूप छान लागते. यासोबतच, उन्हाळ्यात ते आणखी फायदेशीर ठरते. बेलाचा रस बनवताना, प्रथम लगदा पूर्णपणे काढून टाका आणि त्याच्या बिया वेगळ्या करा आणि नंतर मिक्सर जारमध्ये बारीक करा. यानंतर, बारीक चाळणीच्या मदतीने पाणी घालून ते गाळून घ्या. यामुळे एक परिपूर्ण सरबत तयार होईल.
बेलाच्या रसात गूळ आणि साखर आवडीप्रमाणे वापरू शकता. गुळाने सरबताची चव वाढते.
बेलाच्या सरबताचे फायदे खूप आहेत. बेलफळाचे सरबत रिकाम्या पोटी पिणे हे सर्वात उत्तम असते.
भूक उत्तेजित करण्यासाठी बेलफळाचा सरबत सर्वात उत्तम मानला जातो.
बेलाचे सरबत पिण्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच हे सरबत पिण्यामुळे उष्माघाताची शक्यता कमी होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List