केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या नातीची पतीकडून गोळी झाडून हत्या
केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या नातीची तिच्याच पतीने गोळी झाडून हत्या केली आहे. हत्या केल्यानंतर पती फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मांझी यांची नात सुषमा देवी या बिहारच्या टेटुआ गावात आपल्या बहीण आणि मुलांसोबत राहत होत्या. सुषमा देवी यांचे पती रमेश पाटण्यात ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते. बुधवारी दुपारी 12 वाजता रमेश काम संपवून घरी आले. त्यानंतर रमेश आणि सुषमा यांच्यात कडाक्याचं भांडण झालं. तेव्हा रमेश यांनी देशी कट्टा काढला आणि सुषमा यांच्यावर गोळी झाडली. तेव्हा सुषमा देवी यांची मुलं आणि बहीण धावत तिथे आली तेव्हा सुषमा देवी रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केलं पण त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस आरोपी रमेशचा शोध घेत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List