हिंदुस्थानच्या अडचणी वाढणार, ट्रम्प औषधांवर आयात शुल्क लावण्याच्या तयारीत

हिंदुस्थानच्या अडचणी वाढणार, ट्रम्प औषधांवर आयात शुल्क लावण्याच्या तयारीत

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अतिरिक्त आयात शुल्काच्या माध्यमातून एकापाठोपाठ एक धक्के देत आहेत. चीनवर 104 टक्के अतिरिक्त आयात शुल्क लादण्याची घोषणा केल्यानंतर आता त्यांनी लवकरच औषधांवर मोठे आयात शुल्क लादणार आहोत, असे जाहीर केले आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. देशातील निर्यात महाग होईल आणि देशांतर्गत औषधांच्या किमतीही वाढण्याची भीती आहे. दरम्यान, परदेशी औषध पंपन्यांना अमेरिकेत परत आणणे आणि देशांतर्गत औषध उद्योगाला प्रोत्साहन देणे हा त्यामागचा उद्देश असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

हिंदुस्थान अमेरिकेला मोठय़ा प्रमाणावर औषधे निर्यात करतो. हिंदुस्थान अमेरिकेतून आयात होणाऱया औषधांवर जवळपास 10 टक्के आयात शुल्क वसूल करतो. तर अमेरिका हिंदुस्थानातून येणाऱया औषधांवर कुठल्याही प्रकारचे आयात शुल्क वसूल करत नाही. मात्र ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये नॅशनल रिपब्लिकन काँग्रेस कमिटीच्या बैठकीत केलेल्या भाषणात औषधावर आयात शुल्क लावण्याबाबत बोलताना चीनचा उल्लेख केला होता.

अमेरिकेचा चीनला 125 टक्क्यांचा झटका; 75 देशांना 90 दिवसांसाठी दिलासा

अमेरिकेच्या 104 टक्क्यांनंतर चीनने अमेरिकेतील उत्पादनांवर 84 टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर संतापलेल्या अमेरिकेने चीनवर 125 टक्के आयातशुल्क लादण्याचा निर्णय घेतला आहे. तर 75 देशांनी आपल्याशी आयातशुल्काबाबत संपर्क साधल्याने 90 दिवसांसाठी त्यांच्यावरील अतिरिक्त आयातशुल्क स्थगित करण्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली. मात्र, विविध देशांवर 10 टक्के अतिरिक्त शुल्क शनिवारपासून लागू होईल असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

अमेरिकेला सर्वाधिक नुकसान

ट्रम्प यांच्या घोषणेमुळे अमेरिकेतील औषधांच्या किमती प्रचंड वाढू शकतात आणि त्याचा परिणाम पुरवठा साखळीवर होऊ शकतो, असे अमेरिकेतील औषध पंपनी एली लिलीचे सीईओ डेव्हिड रिक्स यांनी सांगितले. तसेच नवीन औषधांचे संशोधन आणि विकास यामध्येही अडथळे निर्माण होतील, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, इतर देशांमध्ये जी औषधे बनतात त्यासाठी तुम्हाला अधिक किंमत मोजावी लागते. लंडनमध्ये 88 डॉरल्सना मिळणारे तेच औषध अमेरिकेत 1300 डॉरल्सना विकले जात आहे. हे सर्व आता संपेल, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

हिंदुस्थानातील औषध बाजारपेठेवर मोठा परिणाम

सीजीएमपी म्हणजेच करन्ट गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रोडक्टचे प्रमाणपत्र असलेल्या औषध पंपन्यांची जैनरीक औषधे अमेरिका खरेदी करते. हिंदुस्थानात तयार करण्यात आलेली औषधे उत्तम दर्जाची आणि स्वस्त असतात. आपली स्पर्धा चीनशीही आहे. चीनमधील औषधे आपल्या औषधांच्या तुलनेत स्वस्त असतात. परंतु दर्जाच्या बाबतीत हिंदुस्थानातील औषधे उत्तम आहेत. मात्र अमेरिकेने चीनसह हिंदुस्थान आणि विविध देशांतील औषधांवर अतिरिक्त शुल्क लादले तर त्याचा परिणाम देशांतर्गत आणि निर्यात केलेल्या औषधांच्या व्यापारावर तसेच नफ्यावर होईल, असे बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे ऑनररी कन्सल्टंट डॉ. सुरेश सरवडेकर यांनी सांगितले. निर्यात महागल्यामुळे अमेरिकेतील औषधेही महाग होणार आणि येथील पंपन्यांना त्याचा मोठा फटका बसेल, असे ते म्हणाले.

देशात औषधे महागणार

हिंदुस्थानात 12 हजार फार्मास्युटीकल कंपन्या असून त्यातील शेकडोंच्या आसपास बडय़ा पंपन्या जवळपास 40 टक्के जेनरीक औषधे एमेरिकेला निर्यात करतात. चीनकडून कच्चा माल खरेदी करून हिंदुस्थानात स्वस्त आणि उत्तम दर्जाची औषधे तयार केली जातात. परंतु अमेरिकेने औषधांवर अतिरिक्त आयात शुल्क मोठय़ा प्रमाणावर लादले तर चीन कच्च्या मालाचे दर भरमसाट वाढवेल. त्यामुळे हिंदुस्थानात औषधेही महाग होतील, अशी माहिती राज्याचे माजी वैद्यकीय सहाय्यक संचालक डॉ. सुरेश सरवडेकर यांनी दिली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात तुम्ही तर मातृभाषेशी गद्दारी… हिंदीवरून शिवसेनेतील दोन्ही गट आमने-सामने, मंत्री संजय शिरसाट यांच्यावर या नेत्याचा घणाघात
इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात वातावरण तापले आहे. शिक्षण क्षेत्रात हिंदीची ही सक्तीची घुसखोरी वादात अडकली आहे. मनसेच नाही...
‘पैसे कमावण्यासाठी मी कोणत्याही…’, 6 कोटींची गुंतवणूक, शिल्पा शेट्टीला 573% फायदा, असं केलं तरी काय?
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार; अजान रोखण्याचा केल्याचा प्रयत्न आरोप
भाजपच्या आशीर्वादानेच पालिकेत भ्रष्टाचार! प्रशासकांच्या मनमानीला सत्ताधाऱ्यांचा पाठिंबा
नाव ‘चितळें’चे, पण बाकरवडी भलतीच
आयब्रोज विरळ आहेत धड आकारही नाहीये, मग आता चिंता सोडा! घरच्या घरी या उपायांनी आयब्रोजला द्या नवा लूक
रेश्मा केवलरमानी जगातील सर्वात प्रभावी व्यक्तींच्या यादीत, हिंदुस्थानी वंशाची एकमेव महिला