मायक्रो फायनान्सविरोधात दापोलीत आज एल्गार
मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात जनता दल (से) पक्ष आणि कोकण जनविकास समितीने सुरू केलेले आंदोलन आता संपूर्ण रत्नागिरी जिह्यात पसरू लागले असून उद्या 10 एप्रिलला दापोली येथे तर 11 एप्रिलला चिपळूणमध्ये कर्जदार महिलांचा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
मायक्रो फायनान्स कंपन्यांनी रिझर्व्ह बँकेच्या अटीशर्ती डावलून वारेमाप कर्जवाटप केले आहे. एकाच वेळी आठ-आठ, दहा-दहा कंपन्यांनी एकेका महिलेला कर्ज दिले आहे. त्यामुळे ज्यांचे मासिक उत्पन्न पाच-दहा हजार रुपये नाही अशा महिलांना दरमहा दहा-पंधरा ते तीस हजारांपर्यंत हप्त्यापोटी भरावे लागत आहेत, याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी जनता दलाचे प्रभाकर नारकर, संजय परब, जगदीश नलावडे, अॅड. प्रशांत गायकवाड, कोकण जनविकास समितीचे सुरेश रासम, नम्रता जाधव, संग्राम पेटकर, दिनेश राणे यांच्यासह चिपळूण येथील मेळाव्याला ज्येष्ठ समाजवादी नेते व माजी खासदार हुसेन दलवाई हेही उपस्थित राहणार आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List