Hair Care- कढीपत्ता आहे केसांसाठी वरदान; केस काळेभोर, लांबसडक होतील! वाचा सविस्तर

Hair Care- कढीपत्ता आहे केसांसाठी वरदान; केस काळेभोर, लांबसडक होतील! वाचा सविस्तर

कढीपत्ता आणि फोडणी हे न तुटणारं समीकरण आहे. पण असं असलं तरी, कढीपत्ता आणि केस याचंही जवळचं नातं आहे. केसांच्या वाढीसाठी कढीपत्ता हा खूप गरजेचा आहे. कढीपत्त्यामध्ये अमीनो अॅसिड, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी सारखे समृद्ध पोषक घटक असतात जे केसांसाठी खूप गरजेचे असतात. केस तुटणे आणि गळण्यावरही कढीपत्ता खूप उपयोगी मानला जातो.

कढीपत्ता केसांसाठी का आहे महत्त्वाचा

काळ्या केसांसाठी आपण कढीपत्ता सेवन करु शकतो. याकरता किमान 5  ते 7 कढीपत्त्याची पाने रोज धुवून खायला हवीत. रिकाम्या पोटी कढीपत्ता खाणे हे खूपच फायद्याचे आहे. यामुळे शरीरात व्हिटॅमिन बी आणि सी वाढीसाठी चालना मिळते. तसेच कढीपत्त्यामध्ये असलेले घटक कोलेजन वाढवण्यासही मदत करतात.

 

कढीपत्ता आणि कापूर दोन्हीही कोंड्याच्या समस्येवर घरगुती रामबाण उपाय आहे. तुम्हाला कोंड्यामुळे खाज येत असेल तर, कढीपत्ता आणि कापूर बारीक करून पेस्ट तयार करावी. नंतर ही पेस्ट केसांच्या मुळाशी चांगली चोळून लावावी. किमान 1 तास हा पॅक तसाच राहू द्यावा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवावेत.

केस गळती रोखण्यासाठी कढीपत्त्यापासून तेल बनवून वापरू शकतो. यासाठी मोहरीच्या तेलात कढीपत्ता शिजवा आणि केसांना लावा. थोडा वेळ मालिश करा. हे तुमच्या केसांच्या मुळांना पोषण देईल आणि केसांची वाढ जलद होण्यास मदत करेल. याशिवाय, त्यातील अँटीऑक्सिडंट्स तुमचे केस जलद वाढण्यास मदत करतील.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

…यामुळे वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला होता, संभाजीराजे भोसले यांची माहिती …यामुळे वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला होता, संभाजीराजे भोसले यांची माहिती
Raigad waghya dog statue Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा विषय थांबवला नाही. तो काही काळ स्थगित केला होता. केंद्रीय गृहमंत्री...
राज्यात हिंदी तिसरी भाषा सक्तीची करण्यास मनसेचा विरोध, थेट रस्त्यावर उतारण्याचा इशारा
हिंदू धर्मातील लग्नामुळे आजही होते ट्रोलिंग; सैफ अली खानच्या बहिणीकडून दु:ख व्यक्त
सागर कारंडे 61 लाखांची फसवणूक प्रकरण, पोलिसांकडून मोठी कारवाई
‘अक्षय कुमारला राष्ट्रीय पुरस्कार द्या..’; ‘केसरी चाप्टर 2’ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
‘आजही लाज आणि संकोच…’ Samantha Ruth Prabhu चं महिलांच्या अडचणींवर लक्षवेधी वक्तव्य
मे महिन्यात ऊटीला भेट देण्याचा विचार करत असाल, तर हे ठिकाण न विसरता बघा!