अभिनेत्याची फसवणूक; एकाला अटक
पेड टास्कच्या नावाखाली मराठी हास्य कलाकाराची 61 लाखांची फसवणूक प्रकरणी अक्षयकुमार गोपाईनकुमार याला उत्तर सायबर पोलिसांनी अटक केली. त्याने सायबर ठगांना बँक खाती पुरवल्याचे तपासात समोर आले आहे.
तक्रारदार हे हास्य कलाकार आहे. फेब्रुवारीत त्यांना एका महिलेने मेसेज केला. टेलिग्राम आणि इतर सोशल मीडियावर आलेल्या लिंकना लाईक्स करायचे आहे. प्रत्येक लाईक्सला 150 रुपये दिले जातील असे त्यांना सांगितले. त्यावर अभिनेत्याने विश्वास ठेवला. सुरुवातीला त्याना 11 हजार रुपये पेड टास्कच्या माध्यमातून मिळाले. त्या रक्कमेला अभिनेता बळी पडला. त्याने 27 लाख रुपये गुंतवले. ठगाने अभिनेत्याकडून आणखी 19 लाख घेतले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने उत्तर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तपासादरम्यान पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अक्षयकुमारला अटक केली. त्याच्या बँक खात्यात फसवणुकीची काही रक्कम जमा झाली होती. तो काही सायबर ठगांच्या संपका&त होता. सायबर ठगांच्या सांगण्यावरून त्याने ठगांना बँक खाती उघडून दिली होती. त्याला काही रक्कम कमिशन म्हणून मिळत होती. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List