पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे एक पाऊल पुढे, वर्षभरात 16 स्थानकांवर उभारले नवीन फूटओव्हर ब्रिज; मुंबईतील सात स्थानकांचा समावेश
मध्य रेल्वेने मागील आर्थिक वर्षात पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली. वर्षभरात एकूण 16 स्थानकांवर नवीन पादचारी पुलांचे (फुटओव्हर ब्रिज) बांधकाम केले. त्यात मुंबई विभागातील सात रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तसेच 31 मानवयुक्त लेव्हल क्रॉसिंग हटवून त्या ठिकाणी 6 रोडओव्हर ब्रिज, 22 रोड अंडरब्रिजचे बांधकाम केले. यामुळे पादचाऱ्यांची गैरसोय दूर झाली आहे.
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पायाभूत सुविधा विकास, सुरक्षा उपाययोजना तसेच प्रवाशांच्या सोयीसुविधांवर अधिक भर दिला. त्याअंतर्गत मुंबई विभागातील गोवंडी, खांडी, बदलापूर आणि कामण रोड आदी स्थानकांसह संपूर्ण कार्यक्षेत्रातील 16 स्थानकांवर नवीन पादचारी पूल सुरू केले. रूळ ओलांडण्याच्या घटना रोखण्यासाठी वडाळा-किंग्ज सर्कलदरम्यान एक, गोवंडी-मानखुर्ददरम्यान एक आणि शहाड व आंबिवलीदरम्यान एक अशा नवीन मिड-सेक्शन फूटओव्हर ब्रिजचे बांधकाम करण्यात आले. याव्यतिरिक्त भुसावळ विभागात एक, नागपूर विभागात तीन तसेच पुणे विभागात पाच फूटओव्हर ब्रिजची उभारणी केल्याची माहिती मध्य रेल्वेतील अधिकाऱ्यांनी दिली. फूटओव्हर ब्रिजच्या वाढीव संख्येमुळे मध्य रेल्वेने पादचारी सुरक्षेत एक पाऊल पुढे टाकल्याचे स्पष्ट होत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List