यंदाचा लता दिनानाथ मंगेशकर पुरस्कार उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर
या वर्षीचा ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ हिंडाल्को इंडस्ट्रीजचे अध्यक्ष पद्मविभूषण कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. या व्यतिरिक्त ज्येष्ठ लेखक श्रीपाल सबनिस यांना साहित्य क्षेत्राचा, अभिनेते सचिन पिळगावकर, शरद पोंक्षे, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, श्रद्धा कपूर यांना अभिनय क्षेत्रातला दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने या पुरस्काराचे आयोजन करण्यात येते. ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाला नाट्य श्रेत्रातील पुरस्कार जाहीर झाला आहे. तर आरंभ सोसायटी फॉर ऑटिझम या सामाजिक संस्थेलाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
यंदाचा हा पुरस्कार सोहळा 24 एप्रिल रोजी पार्ल्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण होईल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List