गुजरातमध्ये भरधाव बसने अनेकांना चिरडलं, 3 जणांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO आला समोर
गुजरातमधील राजकोटमध्ये बुधवारी सकाळी एका भरधाव वेगात येणाऱ्या इलेक्ट्रिक बसने ट्रॅफिक सिग्नलवर उभ्या असलेल्या अनेक वाहनांना आणि पादचाऱ्यांना धडक दिली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. राजकोट शहरातील एका वर्दळीच्या चौकात ही घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. जो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
याबाबत माहिती देताना पोलीस उपायुक्त जगदीश भांगरवा म्हणाले की, बसने दुचाकी, चारचाकी वाहने आणि पादचाऱ्यांना धडक दिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अपघाताचे भयानक दृश्य समोर आले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाला की, बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे याचा तपास पोलीस करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List