हाडांच्या बळकटीसाठी आवळा का महत्त्वाचा आहे! जाणून घ्या आवळ्याचे केसांसाठी फायदे

हाडांच्या बळकटीसाठी आवळा का महत्त्वाचा आहे! जाणून घ्या आवळ्याचे केसांसाठी फायदे

आवळ्याला सुपरफूड म्हणून ओळखले जाते. आवळा खाण्याचे खूप फायदे असल्याने, आवळ्याचा समावेश आपल्या दैनंदिन जीवनात करणे खूप गरजेचे झालेले आहे. आवळ्यामुळे केसांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास खूप मोठ्या प्रमाणात मदत होते. आवळा कशा आणि कोणत्या पद्धतीने खायला हवा हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

तुम्हाला कच्चा आवळा खायला आवडत नसेल किंवा तो सहज उपलब्ध नसेल तर सुका आवळा किंवा आवळा पावडर देखील एक उत्तम पर्याय असू शकतो. तुम्ही ते बराच काळ साठवू शकता. याचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत राहते, ज्यामुळे आम्लपित्त, अपचन आणि गॅसची समस्या दूर होते. तसेच, जर तुम्ही सुका आवळा किंवा आवळा पावडर खाल्ल्यास घसा खवखवणे आणि सर्दी यापासून आराम मिळतो. वाळलेल्या आवळ्यामध्ये असलेले कॅल्शियम हाडे मजबूत करते आणि सांधेदुखी कमी करते. आवळा पावडर चयापचय गतिमान करते आणि चरबी जाळण्याच्या प्रक्रियेला चालना देते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

कोणता आवळा खाण्यास चांगला आहे?
तुम्हाला आवळ्याची खरी चव आणि अधिक पौष्टिकता हवी असेल तर कच्चा आवळा हा सर्वोत्तम पर्याय आहे. तुम्हाला अधिक काळ आवळ्याचे सेवन करायचे असल्यास, सुका आवळा किंवा आवळा पावडर वापरणे अधिक उत्तम. त्याचवेळी  तुम्हाला सर्दी-खोकला, पचनाच्या समस्या किंवा वजन कमी करण्यात मदत हवी असेल तर आवळा पावडर अधिक फायदेशीर ठरू शकते.

आवळा खा रोगांना दूर पळवा! जाणून घ्या आवळा खाण्याचे फायदे

आवळा कसा घ्यावा?
रोज सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा रस पिणे आरोग्यासाठी चांगले असते. ते लहान तुकडे करून किंवा थोडे मीठ घालून खाऊ शकता. वाळलेला आवळा गरम पाण्यात भिजवून किंवा चहामध्ये मिसळून खाऊ शकतो. तुम्ही आवळा पावडर मध किंवा कोमट पाण्यात मिसळून पिऊ शकता, यामुळे पचन आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. याशिवाय आवळ्याचा मुरंबा हा देखील एक उत्तम पर्याय आहे.

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये...
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण
मंत्री अतुल सावेंना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली, नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तीच्या कामांना स्थगिती
मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा; मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या! बदलापुरात आठ लाखांचे घर 17 लाखांवर