आम्ही मराठी वाचणार… शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
मराठी भाषेला अभिजात दर्जा लाभलेला असला तरी नव्या पिढीमध्ये तिचा पाया भक्कम करण्यासाठी मराठी वाचनाची सवय लावणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघ, लोअर परळ विभागातर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘आम्ही मराठी वाचणार’ हा उपक्रम आयोजित केला आहे.
उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत शनिवार 19 एप्रिल रोजी सकाळी 9.30 ते 11 या वेळेत ना.म. जोशी शाळेसमोरील श्रमिक जिमखाना गार्डन येथे हा विशेष उपक्रम पार पडणार आहे. कार्यक्रमासाठी शाखाप्रमुख गोपाळ खाडये यांचे विशेष सहकार्य लाभणार असून मधुसुदन सदडेकर, संजय चौकेकर, डॉ. प्रकाश पाटील, डॉ. नीलेश मानकर हे उपस्थित राहणार आहेत. सहभागी होणाऱया प्रत्येक विद्यार्थ्याला एक मराठी वर्तमानपत्र आणि एक मराठी पुस्तक भेट दिले जाणार आहे, असे बृहन्मुंबई वृत्तपत्र विव्रेता संघाचे विश्वस्त जीवन भोसले यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List