दर घसरल्यामुळे मिरचीची 14 हजार झाडे काढली

दर घसरल्यामुळे मिरचीची 14 हजार झाडे काढली

कधी दुष्काळ, कधी अवकाळीचा फटका बसत असल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात आहे. त्यातच पिकाला हमीभाव मिळत नसल्यामुळे बळीराजा त्रस्त झाला आहे. मिरचीचे दर पडल्यामुळे एका शेतकऱ्याने तब्बल 14 हजार झाडे काढून टाकली.

पुण्यातील मंचर तालुक्यातील पिंपळगाव येथील राजेंद्र बांगर या शेतकऱ्याने सुमारे लाखभर रुपये खर्च करून लागवड केली. सुयोग्य व्यवस्थापनामुळे पीकही जोमदार आले. परंतु मिरची बाजारपेठेत दाखल होताच भाव पडले. आवक वाढल्यानंतर तर दर आणखी घसरले. परिणामी, उत्पादनखर्चही निघणे कठीण झाले. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने हिरवी मिरचीची तब्बल 14 हजार झाडे उपटून बांधावर टाकली. राजेंद्र बांगर यांची शेती आहे. त्यांनी जानेवारीमध्ये एक एकर क्षेत्रात पॉलिथिन पेपरचा वापर करून ठिबक सिंचनच्या साहाय्याने हिरव्या मिरचीच्या 14 हजार रोपांची लागवड केली. यावर सुमारे एक लाख रुपये खर्च केला. हे पीक दोन महिने जोपासल्यानंतर फळधारणेस सुरुवात झाली. यानंतर मिरची मोठ्या प्रमाणात निघू लागली. सुरुवातीला 17 ते 18 रुपये प्रतिकिलो भाव मिळाला. त्यामुळे यंदा चांगला फायदा होईल, असे शेतकऱ्याने गृहीत धरले होते. परंतु अचानक मोठ्या प्रमाणात आवक वाढू लागली. परिणामी, मिरचीसोबतच अन्य भाज्यांचे दरही प्रचंड घसरले. मागील काही दिवसांत तर मिळणाऱ्या पैशांतून वाहतूक खर्चही निघत नव्हता. त्यामुळे शेतकरी बांगर यांनी संतप्त होऊन शेतातील मिरचीची सुमारे 14 हजार झाडे उपटून बांधावर फेकली.

खरबुजाचे भावही उतरले

मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या खरबुजाची दैनंदिन आवक वाढली आहे; परंतु या वाढत्या आवकेमुळे खरबुजाच्या बाजारभावात लक्षणीय घसरण झाली आहे. आठवडाभरापूर्वी 30 रुपये किलो असलेला भाव 10 ते 12 रुपये किलोपर्यंत खाली आला. यामुळे शेतकऱ्यांना खरबूज लागवडीवर झालेला खर्च वसूल करणे अवघड झाले आहे. उन्हाळ्यात थंडावा देणारे फळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खरबुजाची लागवड फेब्रुवारीत झाली होती आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून काढणी सुरू झाली.

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पिंपळगाव, खडकीचांडोली, निरगुडसर, पारगाव, काढापूर, लाखणगाव भागातील शेतकरी आपला माल विक्रीसाठी मंचर बाजार समितीत आणत आहेत. उन्हाळ्यामध्ये खरबुजाला मागणी वाढून जास्त बाजारभाव मिळेल, अशी अपेक्षा ठेवून अनेक शेतकऱ्यांनी खरबुजाची लागवड केली होती; परंतु मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने भावावर नकारात्मक परिणाम झाला आहे. मागील आठवड्यात चांगल्या प्रतीच्या खरबुजाला 30 रुपये किलोचा भाव मिळाला होता; पण आता 10 ते 12 रुपये किलोवर लिलाव होत आहेत. शेतकऱ्यांच्या सांगण्यानुसार खरबूज लागवडीपासून ते बाजारात येईपर्यंत एकरी 70 ते 80 हजार रुपये खर्च येतो. एकरी 12 ते 14 टन उत्पादन मिळते. यात काढणी आणि वाहतुकीचा खर्चही मोठा आहे. त्यामुळे खरबुजाला किमान 40 ते 50 रुपये किलो भाव मिळणे अपेक्षित आहे; परंतु सध्याचा मातीमोल भाव शेतकऱ्यांना तोट्यात टाकणारा आहे. मागणीपेक्षा उत्पादन जास्त असल्याने भाव १० ते 12 रुपये किलोवर स्थिरावले आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, खर्च वसुलीची चिंता वाढली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड यवतमाळमध्ये पाण्याकरिता वणवण करणाऱ्या 12 वर्षांच्या मुलीचा करुण अंत, मोदी सरकारच्या ‘हर घर जल’ योजनेचे पितळ उघड
‘हर घर जल’ योजनेतून शहरांबरोबरच गावातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाणी पोहोचविण्याच्या मोदी सरकारच्या योजनेचे पितळ उघडे पाडणारी हृदयद्रावक घटना यवतमाळमध्ये...
कोण नामदेव ढसाळ? या कार्यक्रमाचे आयोजन
पक्ष फोडण्यासाठी टोळ्यांसारखा पोलिसांचा वापर केला जातोय! उद्धव ठाकरे यांचे परखड मत
हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
बीड पुन्हा हादरले; प्रदूषणाविरोधात लढणाऱ्या महिलेला लाठ्याकाठ्यांनी अमानुष मारहाण
मंत्री अतुल सावेंना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली, नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तीच्या कामांना स्थगिती
मोदींच्या घरकुल योजनेत साडेचारशे कोटींचा घोटाळा; मिंधेंच्या सत्ताकाळात कंत्राटदारांच्या तिजोऱ्या भरल्या! बदलापुरात आठ लाखांचे घर 17 लाखांवर