नराधम मौलवी चार वर्षे गाडलेल्या शिरावर बसला, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
चार वर्षांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुलाचे शिर सापडल्याने भिवंडीच्या नेहरूनगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. एका मौलवीनेच या मुलाची हत्या करून त्याला दुकानात पुरले होते. एवढेच नव्हे तर हा मौलवी चार वर्षे आपल्या दुकानातच गाडलेल्या शिरावर बसला होता. मालमत्ता कक्षाच्या पथकाने मौलवी गुलाम रब्बानी याच्या मुसक्या आवळल्या असून त्याने दुकानात पुरलेले मुलाचे अवयव उकरून बाहेर काढले आहेत.
याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेच्या नेहरूनगरमधील नवी बस्ती परिसरात राहणारा शोएब शेख (17) हा 20 नोव्हेंबर 2020 मध्ये अचानक बेपत्ता झाला होता. या प्रकरणी शोएबच्या वडिलांनी शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा नोंदवला होता. मदरसामधील मौलवी गुलाम रब्बानी यानेच ही हत्या केल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर पोलिसांनी 2023 मध्ये मौलवीला ताब्यात घेतले. त्याला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले असता या मौलवीने गर्दीचा फायदा घेऊन पोबारा केला. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होते. दरम्यान ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे याच्या पथकाला मौलवीबाबत माहिती मिळताच सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List