काका आले आणि माझ्या कपड्यात हात घातला… लग्नही रक्षासासोबत, सासरचे देखील मारहाण करायचे
मी आठ वर्षांची होते. त्या दिवशी झोपले होते. माझे काका आले आणि त्यांनी माझ्या कपड्यात हात घातला. मी जोरात ओरडले आणि उभी राहिले… हे ऐकूनच अंगावर काटा येतो. ज्याला हे दुःख वारंवार सहन करावे लागले असेल त्याने काय अनुभवले असेल याचा विचार करा. आजही, सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आंचल शर्मा जेव्हा तिच्या खासगी आयुष्याविषयी बोलते तेव्हा ऐकणाऱ्यांना धक्का बसतो. तिच्या तेव्हाच्या जखमा आजही ताज्या असल्याचे भासते.
आंचल शर्मा आज माइल्स ऑफ हॅपीनेस नावाची संस्था चालवते. जिथे ती महिला सक्षमीकरणावर काम करत आहे. पण आंचलला स्वतःला खूप त्रास सहन करावा लागला होता. तिच्या बालपणी तिला केवळ वेदनादायक घटनांना सामोरे जावे लागले नाही तर लग्नानंतरही असेच काही घडले ज्यामुळे कोणाचाही आत्मा थरथर कापेल. आंचलने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये यावर वक्तव्य केले आहे. आंचल स्वत:च्या घरात सुरक्षित नव्हती. तिच्या काकांनीच तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. तसेच तिच्याकडे तिचा मासिक पाळीचा कपडा देखील मागितला होता. कारण ती ज्या भागात राहात होती त्या भागात सॅनिटरी पॅडदेखील उपलब्ध नव्हते.
वाचा: ‘XL साईज काँडम आण… हॉटेलमध्ये…’, प्रसिद्ध उद्योगपतीला पत्नीचे अफेअर कळताच…
आंचल शर्माची कहाणी
आंचल शर्माने सांगितले की तिला लहानपणापासूनच खूप समस्यांना तोंड द्यावे लागले आहे. वडील ऑटो ड्रायव्हर म्हणून काम करायचे. ते खूप दारू प्यायचे आणि जुगार खेळायचे. ते माझ्या आईलाही अनेकदा मारहाण करायचे. बऱ्याचदा परिस्थिती अशी असायची की खायलाही काही मिळत नसे. पाण्यासोबत भाकरी खायचो असे आंचल म्हणाली.
आयुष्यातील सर्वात वेदनादायक घटना
गोष्टी इथेच थांबल्या नाहीत. जेव्हा तिच्या धाकट्या बहिणीचे लग्न झाले तेव्हा तिलाही अशाच छळांना सामोरे जावे लागले. माझ्या धाकट्या बहिणीला तिच्या सासरच्या घरात खूप छळण्यात आले. आंचल शर्माचा दावा आहे की तिच्या धाकट्या बहिणीची हत्या झाली आहे. तिचा मृतदेह सूरजकुंडजवळील नाल्यात फेकण्यात आला होता. ती म्हणते की तिच्या १९ वर्षांच्या बहिणीची हत्या तिच्या पतीनेच केली. त्याचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर त्याला जन्मठेपेची शिक्षाही सुनावण्यात आली होती.
आंचल शर्माचे लग्न आणि घटस्फोट
लग्नानंतर आई आणि बहिणीने जे काही सहन केले आंचलच्या आयुष्यातही तेच घडले. आंचल शर्माने २००७ मध्ये एका दिव्यांग व्यक्तीशी लग्न लावून देण्यात आले होते. त्या माणसाच्या हाताची चार बोटे भाजल्यामुळे नव्हती. लग्नानंतर तिचे लैंगिक शोषण झाल्याचे तिने सांगते. ती म्हणते की तिचा नवरा तिच्याशी क्रूरपणे वागत होता. तिचा दावा आहे की तिचे सासरे आणि नणंद तिला मारहाण करायचे. यामुळे २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
कर्करोगाशी लढा
आंचल शर्माचे दुःख इथेच संपले नाही. आयुष्याने पुन्हा एका नवीन वळणावर नवीन वेदना तिला दिल्या. यावेळी तिला एका प्राणघातक आजाराने ग्रासले होते. हो, तिला स्तनाचा कर्करोग झाला. दरवेळीप्रमाणे, आंचलने यावेळीही धैर्याने परिस्थितीचा सामना केला. २०१८ मध्ये त्यांनी कर्करोगावर मात केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List