शिंदेंच्या साताऱ्यातील जल पर्यटन ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवले, एकनाथावर गणेशाचा कोप

शिंदेंच्या साताऱ्यातील जल पर्यटन ड्रीम प्रोजेक्टचे काम थांबवले, एकनाथावर गणेशाचा कोप

सातारा जिह्यातील मुनावळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जल पर्यटन प्रकल्प उभारणीचे काम मिंधे सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केले होते. या प्रकल्पासाठी कोणतीही परवानगी न घेता काम रेटणाऱ्या एकनाथावर गणेशाचा कोप झाला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या या प्रकल्पाचे काम थांबविण्याचे आदेश वनमंत्री गणेश नाईक यांनी दिले आहेत.

ग्रामीण भागात पर्यटन व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने मुनावळे येथे जल पर्यटन प्रकल्प राबिण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मागील वर्षी मार्च महिन्यात उद्घाटन करण्यात आले होते, मात्र प्रकल्पाच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्याच घेण्यात आल्या नसल्याचे उघडकीस आले आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी याची गंभीर दखल घेत काम थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मुख्य वनरक्षक यांनी लेखी आदेश काढले आहेत.

मुनावळे हे ठिकाण केंद्रीय वन पर्यावरण मंत्रालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ‘इकोसेन्सिटिव्ह झोन’ म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतेही पर्यटन प्रकल्प राबवताना वन आणि पर्यावरण विभागाशी संबंधित विविध प्रकारच्या 16 परवानग्या आवश्यक आहेत, मात्र सद्यस्थितीत मुनावळे येथील जल पर्यटनाच्या प्रोजेक्टला कोणत्याही विभागाची परवानगी नाही.

प्रकल्पाला या प्राधिकरणांची परवानगीच नाही

वन पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय भारत सरकार, केंद्रीय वन्य जीव मंडळ, राज्य वन्य जीव मंडळ, स्थानिक सल्लागार समिती सह्याद्री व्याघ्र राखीव, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, कोयना जलसंपदा विभाग, स्थानिक ग्रामपंचायत या प्राधिकरणांच्या 16 ना हरकत परवानग्याच प्रकल्प सुरू करताना घेतलेल्या नाहीत.

कोयना धरणातील शिवसागर जलाशयात मुनावळे येथे जल पर्यटनाच्या प्रकल्पाचा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ झाला होता. मात्र फडणवीस सरकारने हा प्रकल्पाचे काम थांबवून शिंदेंना धक्का दिला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video
अभिनेता कार्तिक आर्यन आणि श्रीलीला ही जोडी सध्या चर्चेत आहे. त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट संदर्भात दोघेही बिझी आहे. त्यांच्यात अफेअर सुरु...
IPL 2025 गुजरातचा ‘सुंदर’ विजय, हैदराबादला नमवले
महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीच गरज नाही,काय म्हणाले एकनाथ खडसे?
‘एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’; शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर रात्रीतून स्टार बनली, त्यानंतरही ही अभिनेत्री ठरली ‘कास्टिंग काउच’ची शिकार
Pune News – पुण्याच्या नाना पेठेत लाकडी वाड्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू