मल्टिवर्स – साय-फाय आणि हॉरर अनुभव

मल्टिवर्स – साय-फाय आणि हॉरर अनुभव

>> डॉ. स्ट्रेंज

हॉरर चित्रपटप्रेमींमध्ये लोकप्रिय असलेलाबॉक्स ऑफ शॅडोज म्हणजेच घोस्टमेकर हा चित्रपट त्यातील तंत्रज्ञानाच्या समावेशामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. सायफाय आणि हॉरर असा दोन्ही अनुभव देणारा हा चित्रपट नक्की बघायला हवा.

2011 साली आलेला ‘बॉक्स ऑफ शॅडोज’ (हा ‘द घोस्टमेकर’ या नावानेदेखील ओळखला जातो.) हा चित्रपट म्हणजे हॉरर चित्रपटप्रेमींसाठी एक वेगळी मेजवानी आहे. या थरारपटात असलेली तंत्रज्ञानाची बाजूदेखील आपल्याला खिळवून ठेवते. चित्रपटाची कथा सुरू होते काईल या नायकापासून. काईल हा एक उडाणटप्पू, व्यसनी आणि आर्थिक घोटाळे करणारा तरुण आहे. मात्र त्याची प्रेयसी ज्युलिया या सगळ्यापासून अनभिज्ञ आहे. जास्त महाग घराचे भाडे परवडत नसल्याने काईल हा आपला अपंग मित्र सटनसोबत एका घरात राहतो आहे. ज्युलियाचा मात्र त्यांना एकांत मिळावा म्हणून त्याने नवे घर घ्यावे असा हट्ट आहे. एके दिवशी व्यसनामुळे झालेली उधारी फेडण्यासाठी गुंडाकडून काईलला धमकी मिळते आणि काईल काळजीत पडतो. पैसे मिळवण्यासाठी तो आता साफसफाई करणाऱ्या कंपनीत नोकरीला लागतो.

नोकरीच्या पहिल्याच दिवशी काईलला एका विचित्र म्हातारीकडे साफसफाईसाठी जावे लागते. विचित्र दिसणारी, गूढ बोलणारी ही म्हातारी काईलला तळघर साफ करण्यासाठी सांगते. साफसफाई करत असताना काईलला तिथे एक शवपेटी (कॉफिन) सापडते. त्याच वेळी अचानक ती म्हातारी तिथे हजर होते आणि काईलला ती शवपेटी घेऊन जाण्यास सांगते. ही शवपेटी एकांत ठिकाणी पुरून टाक किंवा जाळून टाक. मात्र स्वतसाठी तिचा वापर करू नकोस असेदेखील ती बजावते. काईल मात्र तिचा हा सल्ला धुडकावतो. ही शवपेटी विकून झटपट काही पैसा मिळवता येईल असा विचार करून तो ती पेटी आपल्या घरी घेऊन येतो. पेटीचे काही फोटो काढून तो ते जुन्या वस्तू विक्री करणाऱ्या वेबसाइटवर टाकतो.

विक्रीसाठी शवपेटी नीट स्वच्छ करावी म्हणून काईल तिची साफसफाई करायला घेतो तेव्हा अचानक त्याला त्या पेटीत एक विचित्र यंत्रांची मांडणी आढळते. ही यंत्रणा एका म्युझिक बॉक्सला जोडलेली असते, जो किल्ली फिरवल्याने वाजायला लागत असतो. काईल आता धावत पळत आपला मित्र आणि इतिहास तज्ञ प्लॅटकडे जातो आणि त्याला या पेटीची सर्व माहिती देतो. प्लॅट त्याला काही जुनी पुस्तके, त्यातली चित्रे दाखवतो आणि सांगतो की, ही शवपेटी 15 व्या शतकात बनवण्यात आलेली आहे. एक शास्त्रज्ञ लोकांना छळण्यासाठी, त्रास देण्यासाठी त्या काळात विविध यंत्रे बनवत असे. या शास्त्रज्ञाने पुढे त्याचा आत्मा सैतानाला विकला आणि ही अनोखी शवपेटी तयार केली. इतकी पुरातन शवपेटी आता आपल्याला भरपूर पैसा मिळवून देणार या आनंदात काईल हरखून जातो.

शवपेटीच्या यंत्रणेबद्दल उत्सुकता दाटून आल्याने आता हे तिन्ही मित्र तिचा अनुभव घेण्याचे ठरवतात. थोडा धाडसी असल्याने स्वतः काईल सर्वात आधी त्या पेटीत झोपतो. प्लॅट ती यंत्रणा चालू करतो आणि एका क्षणात काईलचा आत्मा त्याच्या शरीरापासून मुक्त होतो आणि बाहेर पडतो. काईल मृत पावलेला पाहून इतर दोघे घाबरतात आणि त्याला जागे करण्याचा प्रयत्न करू लागतात. मात्र काही क्षणांत पेटीतून वाजणारे सूर बंद होतात आणि काईलचा आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करतो आणि तो डोळे उघडतो. त्याचा अनुभव ऐकून थक्क झालेले दोघे आता स्वतः तो अनुभव घेतात आणि त्या पेटीची शक्ती पाहून अचंबित होतात.

आत्मा मुक्त झाल्यावर सर्वत्र सहज फिरू शकत असल्याने अपंग असलेला आणि स्वतच्या पायावर उभादेखील राहू न शकणारा सटन तर अक्षरश त्या पेटीच्या प्रेमात पडतो. पेटीची यंत्रणा ही त्या सुरांमध्ये दडलेली आहे असा संशय आलेला प्लॅट आता त्या सुरांचा अभ्यास करू लागतो, तर पेटीच्या मदतीने पैसे कमावण्याचे नवनवे उपाय काईल ठरवू लागतो. या सगळ्या काळात प्लॅटला अचानक मृत्यूची देवता दिसू लागते आणि ती जिन्यावरून ढकलून त्याची हत्यादेखील करते. पेटीच्या ताकदीने आता चक्क चालायला लागलेला सटन ज्युलियाच्या प्रेमात पडतो आणि काईलच्या जिवावर उठतो. यातून काईलचा पेटी नष्ट करण्याचा तर सटनचा तिला वाचवायचा लढा चालू होतो आणि एक अनोखी कथा पडद्यावर साकारायला लागते. साय-फाय आणि हॉरर अशा दोन्ही भागांत बळकट असलेला हा आत्मामुक्तीचा अनुभव प्रत्येकाने नक्की घ्यायला हवा.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video
अभिनेता कार्तिक आर्यन आणि श्रीलीला ही जोडी सध्या चर्चेत आहे. त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट संदर्भात दोघेही बिझी आहे. त्यांच्यात अफेअर सुरु...
IPL 2025 गुजरातचा ‘सुंदर’ विजय, हैदराबादला नमवले
महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीच गरज नाही,काय म्हणाले एकनाथ खडसे?
‘एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’; शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर रात्रीतून स्टार बनली, त्यानंतरही ही अभिनेत्री ठरली ‘कास्टिंग काउच’ची शिकार
Pune News – पुण्याच्या नाना पेठेत लाकडी वाड्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू