आरोग्य संपदा – युटय़ूब डाएटला भुलू नका

आरोग्य संपदा – युटय़ूब डाएटला भुलू नका

>> डॉ. चेतन वेदपाठक

सध्या युटय़ूब व्हिडीओ पाहून त्यानुसार आहार-विहार स्वीकारले जातात. केवळ व्हिडीओचा संदर्भ घेऊन अतर्क्य आहारशैलीचा अवलंब केल्यामुळे चुकीच्या परिणामांना सामोरे जावे लागण्याची उदाहरणेही तितकीच आहेत. आपले शरीर सुडौल असावे, निरोगी असावे असे वाटण्यात काहीच चुकीचे नाही, परंतु यासाठी योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत जरुरीचे आहे. केवळ व्हिडीओला भुलून आपल्या कुवतीपेक्षा जास्त व्यायाम करणे आणि यासाठी सोशल मीडियावरील अननुभवी व बेभरवशाच्या मंडळींचे समुपदेशन, सल्ले पाळणे हे कितपत संयुक्तिक आहे हे विचारण्याची गरज आता आली आहे.

काही दशकांपूर्वी आलेल्या शारीरिक मापदंडांनी चंदेरी दुनिया उल्लंघून घराघरांत कधी चंचुप्रवेश केला ते कळलेसुद्धा नाही. जागतिकीकरणाच्या वाऱयाने जगाला किती वेगवेगळ्या नवीन गोष्टींची सवय लावली तेही कळले नाही. ‘झीरो फिगर’ आणि ‘सिक्स पॅक अॅब्स’च्या वेडाने तरुणाईला सपशेल वेड लावले. आज सोशल मीडियाच्या जमान्यात ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मती’ऐवजी ‘घरोघरी नवीन खुळे जन्मती’ असे म्हणायची वेळ आली आहे. दिवसागणिक असंख्य आहार समुपदेशक म्हणजेच डाएटिशियन किंवा न्युट्रिशनिस्ट जन्म घेऊन आपणा सर्वांवर नवनवीन आहार शैलींचा मारा करत आहेत. हे स्वयंघोषित तज्ञ वजन घटवणे किंवा वायावर अधिकारवाणीने बोलत आहेतच, पण त्यासोबत अनेक सप्लिमेंटस्ची जाहिरातही करत आहेत. अर्थात ही सगळी डाएट्स व त्यातले अन्न घटक अनेकदा आपल्या देशात उगवतच नाही आणि त्या घटकांचा समावेश आपल्या जेवणात केला पाहिजे असे हे तज्ञ सांगतात. उदाहणार्थ किटो डाएट, इंटरमिटंट फास्टिंग, व्हिगन डाएट… वगैरे.

कुठल्याही व्यक्तीला न तपासता त्याच्या शारीरिक, मानसिक, आत्मिक अवस्थेचा विचार न करता त्याला या प्रलोभनांना बळी पाडणे कितपत संयुक्तिक आहे? प्रत्येक खंडातील व्यक्तींचे शारीरिक संघटन, चयापचय प्रक्रियेचा वेग हा वेगवेगळा असतो. शारीरिक संघटनातही वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचा संयुक्तिक अभ्यास करून तुमच्या राहणीमानाचा, खाण्यापिण्याच्या सवयींचा अभ्यास करून त्यानुसार आहार, विहार व व्यायाम यांचे समुपदेशन व्हायला हवे. परंतु आजच्या या सोशल मीडियाच्या काळात पायलीला पन्नास तज्ञ जन्माला येत आहेत. आपल्या पारंपरिक जेवण बनविण्याच्या व खाण्याच्या पद्धतींना चुकीचे ठरवून आपणावर नवनवीन आहार पद्धती व सुपर फूडस्चा पद्धतशीर मारा करण्यात येत आहे. निरोगी शरीराची व्याख्या बदलून फक्त प्रमाणबद्ध, आकर्षक शरीर म्हणजेच निरोगी असे सतत ठसविण्यात येत आहे.

‘समदोष समाग्निश्च समधातु मलक्रियाः
प्रसन्न आत्मेंद्रिय मन स्वस्थ इत्यभिधीयते’
आयुर्वेदात स्वस्थ माणसाची व्याख्या फक्त शरीरापुरती मर्यादित न ठेवता आत्मा, इंद्रिये आणि मन यांचाही विचार केला आहे. संपूर्ण स्वास्थ्य हवे असेल तर या सर्वांचा विचार करायला हवाच.

तज्ञ आहार समुपदेशक, तज्ञ चिकित्सक आणि तज्ञ प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण आपला प्रवास सुरू केला पाहिजे. औट घटकेच्या चुकीच्या संकल्पनांच्या मागे लागून आपल्या जीवनाशी खेळणे धोक्याचे ठरते. आपल्या आजूबाजूला आजकाल अनेक धक्कादायक मृत्यूच्या घटना ऐकायला मिळतात. अकाली, तरुणपणी अचानकपणे होणाऱया हृदयविकाराने मृत्यूचे प्रमाण कमालीचे वाआहे. यात आपली चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव तसेच अवेळी व्यायाम, अति व्यायाम किंवा व्यायामाचा संपूर्ण अभाव, जीवनात कमालीचा वाताणतणाव, नातेसंबंधातील तणाव व कटुता तसेच विविध प्रकारची व्यसने या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे.

आपल्याला मिळालेले हे जीवन अमूल्य आहे. आपले हे जीवन आनंददायी करण्यासाठी व आनंद उपभोगण्यासाठी शरीर निकोप, निरोगी व सक्षम असणे व ते तसेच जीवनाच्या शेवटापर्यंत ठेवून दीर्घायुष्य जगणे हे आपले ध्येय असले पाहिजे. या करता आपल्या पारंपरिक, शास्त्रोक्त आणि सात्म्य आहाराचे सेवन करणे महत्त्वाचे आहे. आयुर्वेदात आहाराचे महत्त्व अनन्यसाधारण सांगितले आहे. आपल्या हवामानास, ऋतुस आणि देशकालास साजेसं आणि शरीराला फायदेकारक अन्नाच्या सेवनाने आरोग्य अबाधित राहील. खोटय़ा भूलथापांना न फसता योग्य तज्ञांचे मार्गदर्शन घेणे संयुक्तिक ठरेल. तरच आपण सर्व निरोगी समाज, प्रदेश, राष्ट्र विकसित करू शकू.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video
अभिनेता कार्तिक आर्यन आणि श्रीलीला ही जोडी सध्या चर्चेत आहे. त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट संदर्भात दोघेही बिझी आहे. त्यांच्यात अफेअर सुरु...
IPL 2025 गुजरातचा ‘सुंदर’ विजय, हैदराबादला नमवले
महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीच गरज नाही,काय म्हणाले एकनाथ खडसे?
‘एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’; शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर रात्रीतून स्टार बनली, त्यानंतरही ही अभिनेत्री ठरली ‘कास्टिंग काउच’ची शिकार
Pune News – पुण्याच्या नाना पेठेत लाकडी वाड्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू