उद्धव ठाकरे यांचे आराध्य दैवत औरंगजेब, मातोश्रीवर त्याचाही फोटो लागणार, शिवसेना नेते संजय निरूपम यांचा घणाघात
शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे यांना एक नवीन गुरु मिळाला आहे. उद्धव ठाकरेंचे नवीन आराध्य दैवत औरंगजेब झाला आहे. लवकरच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोजवळ औरंगजेबच्या फोटो मातोश्रीवर लावणार आहे. मातोश्रीमध्ये बाळासाहेबांच्या फोटोच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोच्या बाजूला ते औरंगजेबचा फोटो लावतील. त्या दिशेने त्यांचा कारभार सुरु आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केली.
पत्रकार परिषदेत बोलताना संजय निरुपन म्हणाले, उद्धव ठाकरे छत्रपती शिवरायांचा फोटो पण काढून टाकतील. उबाठामध्ये जे काही चाललेले आहे त्याचा मी निषेध करतो. त्यांना सरळ सांगतो तुम्ही ज्याप्रमाणे अँटिव्ह अँटी हिंदू स्टॅन्ड घेत आहात ते चुकीचे आहे.
संजय निरुपन म्हणाले, माझा प्रश्न उद्धव ठाकरे यांना आहे. उद्धव ठाकरे यांची मौलाना बरोबर मीटिंग कुठे कुठे झाली. कधी झाली झाली. ही मिटींग आयोजित करणारे संजय राऊत आहेत. सध्या संजय राऊत औरंगजेब आणि नागपूर दंगलीवर ज्या प्रमाणे मुस्लीम समाजाची समर्थक भूमिका घेत आहे ते पहिल्यावर पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांची आठवण होते. त्यांनीही मुस्लिम मतांची लचारी केली. तिच भूमिका आता संजय राऊत घेत आहे.
दिशा सालियाना प्रकरणाची सत्य समोर आणा
सुशांत सिंग आणि दिशा सालियान या विषयावर बोलताना संजय निरुपन म्हणाले, दिशा सालियान हिच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. कोणत्याही मुलीचा बाप असा खोटे बोलू शकत नाही. यामुळे सतीश सालियान यांची जी याचिका आहे ती स्वीकारली पाहिजे. कोर्टाने त्याच्या आधारावर मुंबई पोलिसांना ऑर्डर दिली पाहिजे. दिशा सालियान हिची मृत्यूचे जे एक रहस्य आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणात जे काही लोक आहेत त्यांना कोणालाही सोडू नये. उद्धव ठाकरे यांच्या मुलाचा हाथ दिशा सालियान हिचा हत्यामध्ये आहे, असे आम्हाला वाटते. या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.
अजित पवार यांच्या वक्तव्यावर…
अजित पवार यांच्या वक्तव्यावर संजय निरुपन म्हणाले, अजित पवार यांनी जे म्हटले आहे ते आम्हाला दुरुस्त करायचे आहे. देशभक्त आणि भारतीय असलेल्या मुस्लिमांवर आमचे कोणतेही आरोप नाहीत. पण दंगल घडवणारा कोणताही मुस्लिम देशद्रोही आहे. आम्ही त्याच्यावर कारवाई करू. अजितदादाही त्याला वाचवू शकणार नाहीत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List