खाऊगल्ली – खाऊया आइसकँडी!

खाऊगल्ली – खाऊया आइसकँडी!

>> संजीव साबडे

हल्ली आइक्रीम म्हटलं की कप वा कोनमधील थंड पदार्थच डोळ्यासमोर येतो. आता आइक्रीममध्ये बरेच ब्रॅण्ड्स, व्हरायटी व फ्लेवर्स आले आहेत. अगदी लिंबू मिरची, लिंबू आलं, आंबा, पेरू, जांभूळ, कलिंगड, केळी, स्ट्रॉबेरी, लिची अशा असंख्य फळांची चव आइक्रीममध्ये मिळू शकते. मोठय़ा आइक्रीम पार्लर म्हणजे दुकानात एका कुटुंबातील चार जण वा मित्र गेले की प्रत्येकाला काही तरी वेगळं हवं असतं. त्यात टर्कीश आइक्रीम देण्याची पद्धतही गमतीदार. हातात कोन दिला जातो, पण त्यात आइक्रीम भरताना ग्राहकांना खेळवलं जातं. अशा वेळी लहान मुलं तर चिडून रडायला लागतात आणि मोठी माणसंही अस्वस्थ होतात. पण मार्केटिंगची ही नवी आगळी पद्धत आहे मात्र मस्त.

उन्हाळा स्रू झाला की आइक्रीम खाण्याची इच्छा होणं हे स्वाभाविकच. यंदा तर उन्हाळा लवकरच स्रू झाला आहे आणि आताच राज्याच्या अनेक भागात तापमान 40 अंश वा त्याहून वर गेलं आहे. अशा उन्हाळ्यात जशी घरात विजेची मागणी वाढते अगदी तशीच थंड पेय आणि आइक्रीमचीही मागणी खूप वाढते. आता घरोघरी फ्रिज असल्याने आइक्रीम बनवणं खूप सोपं झालं आहे. अगदी ताज्या फळांचं आइक्रीमही अनेक घरात बनतं. आइक्रीम खाणं ही अपूर्वाई राहिलेली नाही. पण गंमत म्हणजे आपल्याकडे कडक उन्हात जितकं आइक्रीम खाल्लं जातं, त्याहून अधिक ऊन उतरल्यानंतर म्हणजे संध्याकाळी ते खाल्लं जातं. मुंबईकर दिवसा उन्हात लिंबू सरबत, काला खट्टा, कलिंगड सरबत, संत्री वा मोसंबी ज्यूस वा ताक व लस्सी वा अगदी चहाही पितात, पण आइक्रीम संध्याकाळी. जी काही ऐश करायची ती फक्त संध्याकाळीच.

काही वर्षांपूर्वी आइक्रीम म्हटलं की, डोळ्यासमोर थंडगार बर्फाची रंगीत कँडीच यायची. त्याला कँडी नव्हे, तर आइक्रीम वा आइसफ्रुट असंच म्हटलं जाई. त्याला पॉप्सीकल म्हणतात हे तर आपल्या गावीही नव्हतं. लाल, पिवळा, हिरवा, नारिंगी अशा विविध रंगांच्या आइसकँडी खूप लोकप्रिय होत्या. शाळेत असताना मधल्या सुट्टीत पाच व दहा पैशांची आइसकँडी खाल्ली जायची. उन्हाळ्यात घरावरून गाडी चालली की आईकडून पाच-दहा पैसे घेऊन ती विकत घ्यायची आणि हळूहळू चोखत राहायची. तसं करताना मध्येच त्यातील रंग वा बर्फाचा तुकडा कपडय़ांवर पडला की घरी ओरडा ठरलेला. तो रंग पटकन जायचाच नाही. लिंबू, संत्री, रोझ… असे तीन चार फ्लेवर्सच असायचे तेव्हा. मग नंतर खस, काला खट्टा, आंबा, द्राक्ष अशा चवी त्यात आल्या. तेव्हा व्हॅनिला कँडीही मिळायची. पण त्या पांढऱयापेक्षा रंगीत कँडी लोकप्रिय असायच्या.

गंमत म्हणजे आइक्रीमचा शोध एका 11 वर्षांच्या अमेरिकन मुलामुळे 1911 साली लागला. कडाक्याच्या थंडीच्या रात्रीत त्याने आपला सोडय़ाचा ग्लास चुकून घराबाहेर ठेवला. सकाळी त्याचा बर्फ झाला होता आणि आकार होता त्या ग्लासचा. पाण्यात वेगवेगळे रंग, साखर घालून अशी कँडी केली तर ती चांगली लागते, हे लक्षात आलं. त्यातून ज्याला आता पॉप्सीकल असं नाव पडलं ती आइसकँडी तयार झाली. आता पुन्हा तरुणांमध्ये आइसकँडी विकत घेऊन खात खात फिरायची फॅशन आली आहे. कॉलेज परिसरात आइसकँडीच्या पुन्हा गाडय़ा लागताना दिसत आहेत. त्यांना पाहून लहानपणच आठवतं. तेव्हा क्वालिटीची गाडी सर्वत्र फिरायची. ती आताही ठिकठिकाणी दिसते. क्वालिटीची पॉप्सीकल खूपच मस्त आणि दाट आहे. पूर्वीसारखा पारदर्शक व पाणीदार नाहीत. नुसतं रंगीत पाण्याचा बर्फ चोखतोय, असं अजिबात वाटत नाही. चवही अतिशय उत्तम. त्यांची किंमत 20 रुपयांपासून स्रू होते. ते असंख्य दुकानातही मिळतात. अमूलचे पॉप्सीकलही खूप छान आहेत. त्यांची किंमत 15 रुपयांपासून स्रू होते. अमूलचे दूध व अन्य पदार्थ खूप लोकप्रिय असले तरी त्यांचे पॉप्सीकल वा आइसकँडी तितकीशी माहीत झालेली नाही.

मुंबईत आइक्रीम बनवणाऱ्या असंख्य मोठ्य़ा-छोट्य़ा कंपन्या आहेत. जवळपास 50 तरी आइक्रीमचे ब्रॅण्ड्स आहेत. त्यापैकी काही तर खूपच महाग. पण सर्वात स्वस्त व लोकप्रिय पॉप्सीकलचे मोजके, पण खूप छान ब्रॅण्डही मुंबईत आहेत. सायन रेल्वे कॉलनीतील बॉम्बे पॉप्सीकल कंपनी खूप प्रसिद्ध आहे. पूर्व उपनगरात आणि ठाण्यापर्यंत यांची आइसकँडी पोहोचते. त्यांची काही मिल्क आइक्रीम्सही आहेत. तीही चांगली आहेत. त्या भागात गेलात तर अवश्य ही आइसकँडी घ्यावी. ती खाता वा गिळता येत नाही. लहानपणीप्रमाणे ती आताही चोखावी लागते. तसं करताना एक विशिष्ट आवाज येत राहतो. मालाडला इनॉर्बिट मॉलच्या समोरील बाजूला लिटल लोको पॉप्समध्येही खूप छान चवीच्या आइसकँडी मिळतात. तिथे जाणारे एका वेळी दोन तीन आइसकँडी आरामात संपवतात. कांदिवली पूर्वेला महान प्रोटिन्स नावाच्या ठिकाणी मिळणाऱया आइसकँडीही खूप लोकप्रिय आणि छान आहेत.

अंधेरीला न्यू लिंक रोडवर गुजराती हॉलपाशी बेलो पॉप्स आहे. गोरेगावला मोतीलाल नगरमध्येही बेलो पॉप्सचं दुकान आहे. यांच्याकडेही अनेक चवीच्या उत्तम कँडी मिळतात. तेथील आंबा, द्राक्ष, लिंबू, गुलाब, संत्री, किवी, पेरू, अननस, काला खट्टा अशा चवीच्या आइसकँडी खूप लोकप्रिय व छान आहेत. नवी मुंबईत वाशीच्या सेक्टर 29 मध्ये स्कुझो आइस ओ मॅजिकमधील आइसकँडीही भन्नाट आहे. ठाण्याच्या चरई भागातील सिल्क क्रीममध्ये पाणीपुरी, जिरा मसाला, लाईम मोजीटो, पायनॅपल मिक्स अशा अनेक चवीच्या आइसकँडी मिळतात. डोंबिवली पूर्वेला पोस्ट ऑफिससमोर अरुण आइक्रीमच्या हॅप डेली दुकानात आइसकँडी किंवा आइस बारचे अनेक प्रकार आहेत. पण तिथे जाणं मात्र झालेलं नाही. इतरत्रही स्थानिक आइसकँडीवाले असतीलच.

प्लास्टिक पिशवीत कँडीसदृश्य मिळणाऱया प्रकाराला पेप्सी म्हणत. ते पेप्सी आइस आजही मिळतात. उन्हाळ्यात मिल्की आइक्रीमपेक्षा पॉप्सीकल वा पेप्सी आइसचाही आस्वाद घ्यायला हवा.

[email protected]

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video कार्तिक आर्यन याच्या मागून चालणाऱ्या श्रीलीला हीला गर्दीने खेचले, स्टाफने वाचवले, हैराण करणारा Video
अभिनेता कार्तिक आर्यन आणि श्रीलीला ही जोडी सध्या चर्चेत आहे. त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट संदर्भात दोघेही बिझी आहे. त्यांच्यात अफेअर सुरु...
IPL 2025 गुजरातचा ‘सुंदर’ विजय, हैदराबादला नमवले
महाजन यांनी उगाच आदळ आपट करण्याची काहीच गरज नाही,काय म्हणाले एकनाथ खडसे?
‘एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’; शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य
पहिल्या चित्रपटाच्या यशानंतर रात्रीतून स्टार बनली, त्यानंतरही ही अभिनेत्री ठरली ‘कास्टिंग काउच’ची शिकार
Pune News – पुण्याच्या नाना पेठेत लाकडी वाड्याला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल
पॅरा जंपिंगदरम्यान पॅराशुटमध्ये तांत्रिक बिघाड, हवाई दलातील पॅरा जंप प्रशिक्षकाचा जमिनीवर कोसळून दुर्दैवी मृत्यू