दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले उद्धव ठाकरेंचे दोन फोन आले अन्…

दिशा सालियन प्रकरणात नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले उद्धव ठाकरेंचे दोन फोन आले अन्…

दिशा सालियनच्या वडिलांनी मुंबई हाय कोर्टात याचिका दाखल केली आहे, त्यामुळे पुन्हा एकदा पाच वर्षांनंतर हे प्रकरण चर्चेत आलं आहे. या याचिकेत शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट केला आहे. उद्धव ठाकरे यांचे आपल्याला दोन फोन आल्याचा दावा राणे यांनी केला आहे.

नेमकं काय म्हणाले नारायण राणे? 

त्यावेळी ही घटना घडली तेव्हा मी मुंबईवरून घरी चाललो होतो, तेवढ्यात वांद्रे क्रॉस केल्यावर फोन आला. मिलिंद नार्वेकरचा फोन होता. म्हणाले, दादा साहेबांना तुमच्याशी बोलायचं आहे. मी म्हटलं, कोण साहेब. म्हणाले, उद्धवजी, त्यांच्याबरोबर मी आहे. ते गाडी चालवत आहेत. त्यांना बोलायचं आहे. मी म्हटलं, द्या.

त्यांनी फोन घेतल्यावर मी म्हटलं जय महाराष्ट्र साहेब, बोला, ते म्हणाले, तुम्ही अजून जय महाराष्ट्र बोलता. मी म्हटलं, मरेपर्यंत बोलणार. हे माझं उत्तर लगेच. तुम्हाला माहीत आहे मी थांबत नाही.

उद्धव ठाकरे म्हणाले, नाही साहेब मला हे बोलायचंय तुम्हाला मुलं आहेत. मलाही मुलं आहेत. सध्या तुम्ही जे काही प्रेसला बोलता. आदित्यचं नाव घेता. माझी विनंती आहे की तुम्ही त्याचा उल्लेख करू नये. असं वाटतं म्हणून विनंती करायला फोन केला. मी म्हटलं, उद्धवजी एक गोष्ट लक्षात ठेवा. एक तर मी अमूक ठिकाणी, अमूक याच्यात कोण आहे याचा उल्लेख केला नाही. निरपराध एका मुलीची अत्याचार करून हत्या झाली हे म्हणतोय. आरोपींना अटक झाली पाहिजे हे म्हणतोय. त्यात तडजोड नाही. फक्त तुम्ही तुमच्या मुलाचं नाव घेतलं, त्याला संध्याकाळी जिथे जातो, तिथं जाण्यापासून सांभाळा. सांगा त्याला हे बरं नाही. माझ्या घराच्या समोर तो डिनो मोरिया राहतो. तिथे हे लोक जमतात आणि काय साडे तीन चार तास धुमाकूळ घालतात. मला माहीत नाही. मला माहीत आहे, पण तुम्हाला सांगणार नाही. म्हणून मी सांगितलं तुम्ही त्यांना सांभाळा. उद्धव ठाकरे म्हणाले, साहेब मी पाहतो, सांगतो. पण तुम्ही तेवढं सहकार्य करा. मी म्हणालो, ठिक आहे. अन् त्यांनी फोन ठेवला, असं राणे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की,  दुसरा फोन हा कोविड असताना आला. त्यावेळी माझ्या हॉस्पिटलचं उद्घाटन होतं. माझी राज्य सरकारकडे एक परवानगी बाकी होती. तेव्हा त्यांचा फोन आला. तुम्ही फोन केला होता. मी म्हटलो हो. कॉलेजच्या परवानगीसाठी केला होता.
उद्धव म्हणाले, साहेब ते तर मिळेलच. पण तुम्हाला सांगतो जरा तुम्ही, प्रेस घेताना तो उल्लेख टाळाल तर बरं होईल. मी म्हटलं परत एकदा सांगतो, तुम्ही म्हणता तसा मी उल्लेख केला नाही. पण एक मंत्री होता असं मी म्हणतोय.  हे दोन फोन त्यांनी केले, असं राणे यांनी म्हटलं आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

माणसांच्या मित्राला माणसाचा आजार जडला, कुत्रे बनले मधुमेहाची शिकार माणसांच्या मित्राला माणसाचा आजार जडला, कुत्रे बनले मधुमेहाची शिकार
शिर्डीत साईनगरीत आता भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनलेला असतो. साई मंदिर परिसरातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर बनला आहे. या कुत्र्यांना...
Ladki Bahin Yojana : मोठी बातमी! लाडक्या बहिणींना 3000 हजार रुपये मिळणार?
उद्धव ठाकरे यांचे आराध्य दैवत औरंगजेब, मातोश्रीवर त्याचाही फोटो लागणार, शिवसेना नेते संजय निरूपम यांचा घणाघात
‘विधानसभेत सगळे खोक्याभाईच भरलेत’; राज ठाकरेंच्या निशाण्यावर नेमकं कोण?
शाळकरी मुलांकडून ‘नवरी मिळे हिटलरला’ फेम एजेवर प्रेमाचा वर्षाव; पहा खास व्हिडीओ
‘नवऱ्याला रंगे हात पकडलं तेव्हा…’, घटस्फोटानंतर श्वेता तिवारीचं मोठं वक्तव्य
नामवंत कीर्तनकारांसोबत रंगणार ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’