छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते, त्यांच्या सैन्यात मुस्लीमही होते, नितीन गडकरी यांचे प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराज हे 100 टक्के सेक्युलर राजे होते. सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीतील अर्थ सर्व धर्म समभाव. सर्व धर्माच्या सोबत समान न्याय करणे हाच सेक्युलर शब्दाचा खरा अर्थ आहे आणि शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम सैनिक देखील होते असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील प्रसिद्ध कादंबरीकार विश्वास पाटील यांनी लिहिलेल्या दोन इंग्रजी पुस्तकांचे प्रकाशन नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
नितीन गडकरी पुढे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज यांचं जीवनचरित्र इंग्रजीत येतंय ही आनंदाची बातमी आहे. शिवाजी महाराज यांचे कार्य प्रेरणादायी आहे. आमच्या आई आणि वडीलांपेक्षाही आमच्या मनात शिवाजी महाराज यांचं स्थान मोठं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे उत्तम वडील देखील होते आणि उत्तम राजा देखील होते. अफजल खान आणि शिवाजी महाराज यांची प्रतापगडावर भेट झाली. तेव्हा शिवाजी महाराज यांच्यावर अफजल खान याने वार केला. तेव्हा शिवाजी महाराज यांनी अफजल खानचा वध केला. त्यानंतर शिवाजी महाराज यांनी आदेश दिला की अफजल खानाची कबर सन्मानाने झाली पाहिजे असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
महाराज 100 टक्के सेक्युलर राजे
सेक्युलर शब्दाचा इंग्रजी डिक्शनरीत अर्थ सर्वधर्म समभाव. सर्व धर्माच्या सोबत समान न्याय करणे हा सेक्युलर शब्दाचा खरा अर्थ आहे. छत्रपती शिवाजी महाराज 100 टक्के सेक्युलर राजे होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला सन्मानाने माघारी पाठवले. वेळ प्रसंगी शिवाजी महाराज यांनी मुलाला शिक्षा करायला देखील मागे पुढे पाहिलं नाही. नाहीतर राजकारणात आजकाल सगळे आपली मुलं, मुली आणि पत्नी यांना तिकीट मागतात असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
छत्रपती महाराजाचं कार्य जगभर जायला हवं
छत्रपती शिवाजी महाराज यांचं व्यक्तीमत्व परिपूर्ण होते. आपण अपूर्ण आहोत. जात, पात धर्म, पंथ याने व्यक्ती मोठा होत नाही तर पराक्रमाने मोठा होतो. शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुस्लीम सैनिक देखील होते. काही शिकायचं असेल, प्रेरणा घ्यायची असेल तर शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचावे. शिवाजी महाराज यांचं कार्य फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता जगभर जायला हवं असेही नितीन गडकरी यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List