‘अरे थांबना…’ ओरडणाऱ्या चाहत्यावर सई वैतागली; तिचे रिअॅक्शन पाहून नेटकरीही म्हणाले,’किती गोड’
30 मार्च रोजी सर्वत्र गुढीपाडवा अगदी उत्साहात साजरा करण्यात आला. सामान्यांप्रमाणे मराठी सेलिब्रिटींनीही गुढी उभारून नवीन वर्षाचं स्वागत केलं आहे. गुढीपाडवा म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात, परंपरेचा उत्सव आणि आनंदाचा सोहळा. तसेच अनेक ठिकाणी गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्राही निघाल्या.
यंदाच्या शोभायात्रेचे खास आकर्षण ठरलं ‘गुलकंद’ चित्रपटाची टीम
मुंबईतील गिरगाव येथे देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडवा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. शोभायात्रेचा उत्साह, ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषा आणि सेलिब्रिटींचा जल्लोष पाहायला मिळाला. यंदाच्या शोभायात्रेचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे ‘गुलकंद’ या आगामी मराठी चित्रपटाची टीम. अभिनेत्री सई ताम्हणकर, समीर चौघुले, प्रसाद ओक आणि ईशा डे हे कलाकार या सोहळ्यात सहभागी झाले होते. या सर्वांनी गुढीपाडव्यानिमित्ताने पारंपरिक पोषाख परिधान केला होता.
सईसोबतही घडला एक मजेदार किस्सा
तसेच ‘गुलकंद’ या चित्रपटाच्या निमित्ताने या सर्व कलाकारांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. तसेच शोभायात्रेला सेलिब्रिटींना पाहण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती. यावेळी सईसोबतही एक मजेदार किस्सा घडला. ज्याचा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून त्याची चर्चा सर्वत्र होताना दिसत आहे.
“ए सईsss!” अशी हाक मारून चाहत्याने केलं हैराण
शोभायात्रेतील हा सर्वात मजेदार क्षण म्हणजे सई ‘गुलकंद’च्या टीमसोबत मीडिया मुलाखत देत होती. तेवढ्यात मागून एक चाहता मोठ्या आवाजात ओरडत होता. “ए सईsss!” अशी हाक मारताना तो या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. त्याने मारलेली वारंवार हाक सईच्या कानावर पडताच ती लगेच हात उंचावून त्याला प्रतिसाद देते. पण तो काही तिला आवाज द्यायचं थांबत नाही.
ऑटोग्राफसाठी मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागला
तो पुन्हा तिच्या नावाने ओरडू लागला आणि तिला ऑटोग्राफसाठी मोठ्या मोठ्याने आवाज देऊ लागला. सई मात्र मुलाखत देण्यात व्यस्त होती. पण त्याच्या आवाजाला ती वैतागली आणि ती त्याला म्हणाली “अरे थांब, इंटरव्ह्यू चालू आहे!”. पण चाहता हट्टालात पेटला होता. त्याने एक कागद आणि पेन तिच्या समोर धरत एक सही दे, एक ऑटोग्राफ दे म्हणत ओरडू लागला.अखेर सई चाहत्याच्या हातातून कागद-पेन घेऊन त्याला सही देते. तिच्या या गोड वागण्यामुळे सगळ्यांनाच आनंद झाला. आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांनीही सईच्या या वागण्याचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर @dineshparab या युजरने पोस्ट केलेला आहे.
सईचं चाहत्यांनी केलं कौतुक
या व्हिडिओवर सोशल मीडियावर प्रशंसेचा वर्षाव होत आहे. एका युजरने लिहिलं, “मराठी कलाकार बेस्ट आहेत, त्यांच्यात अॅटिट्यूड नसतो” दुसऱ्याने लिहिलं, “कसली गोड म्हणाली, अरे थांब इंटरव्ह्यू चालू आहे”, तर तिसऱ्या चाहत्याने कमेंट केली आहे की, “हे अगदी मनापासून वाटलं!” स्वतः सईनेही हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत लिहिलं, “या प्रेमासाठी जगणे म्हणजे एक आनंद आहे.”
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List