‘तेव्हा मशिनमध्ये गडबड नव्हती अन् आता…’, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राम शिंदेंचा उत्तम जानकरांना खोचक टोला

‘तेव्हा मशिनमध्ये गडबड नव्हती अन् आता…’, ईव्हीएमच्या मुद्द्यावरून राम शिंदेंचा उत्तम जानकरांना खोचक टोला

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांनी ईव्हीएम विरोधात मोठं आंदोलन उभारलं होतं. निवडणूक ईव्हीएमवर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी त्यांनी मागणी आहे. जर निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या नाहीत तर आपण आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान ईव्हीएम मशीनचा घोटाळा झाला असा आरोप करणाऱ्या आमदार उत्तम जानकर आणि रोहित पवार यांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी खोचक टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले राम शिंदे? 

उत्तम जानकर यांनी ईव्हीएमच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आमदार उत्तम जानकर आणि रोहित पवार यांच्याकडून ईव्हीएमवरून आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांना प्रत्युत्तर देताना राम शिंदे यांनी उत्तम जानकर आणि रोहित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. ईव्हीएम घोटळ्यावरून आमचा गडी केव्हा राजीनामा देतो याची मी वाट पाहत होतो.  जिंकून आल्यानंतरही ईव्हीएममध्ये घोटाळा झाला म्हणून राजीनामा देणार असं म्हणणारे रोहित पवार हे केव्हा राजीनामा देतात याची मी वाट पाहात होतो, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी उत्तम जानकर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. उत्तम जानकर तीन वेळा हरले, त्यावेळी मशीनमध्ये घोटाळा झाला नाही. मात्र निवडून आल्यानंतर त्यांना मशीनमध्ये चूक आढळून आली. आज काल राजकारणामध्ये कोण कोणाबरोबर आहे काहीच कळत नाही, असं राम शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारली होती. महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला होता, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं, महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीचे उमेदवार 232 जागांवर विजयी झाले तर महाविकास आघाडीला मात्र अवघ्या 50 जागांवरच समाधान मानावलं लागलं, या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीकडून ईव्हीएमवर संशय घेत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार? सोलापुरातून मोठी बातमी समोर उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का बसणार? सोलापुरातून मोठी बातमी समोर
लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, महायुतीच्या अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीनं...
गूगल मॅपने पुन्हा दिला धोका, चुकीचे लोकेशन दाखवल्याने कार राँग साईडला गेली अन् दोन तरूणींचा करुण अंत
मासिक पाळीमुळे नवरात्र पूजा करता आली नाही, नैराश्येतून महिलेने उचलले टोकाचे पाऊल
लातूर जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस, फळांसह पालेभाज्यांचे नुकसान
शक्तिपीठ महामार्ग व कर्जमाफी या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर शिंदेंना अडवणार, कुणाल कामराचं गाणं वाजवून विरोध करणार
नवीन सरकार स्थापन होताच वक्फ विधेयक रद्द करू, ममता बॅनर्जी यांचं वक्तव्य
सफाई करायला विहिरीत उतरले, विषारी वायूमुळे 8 जणांचा गुदमरून मृत्यू