Sanjay Raut : कामराचा स्टुडिओ तोडला हे चांगलं काम का?, संजय राऊत यांचा राज ठाकरेंना थेट सवाल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलताना राज ठाकरेंनी तूफान फटकेबाजी केली. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहत असाल तर आमचा तुम्हाला निश्चित पाठिंबा राहील, असं राज ठाकरे हे मुख्यमंत्री फडणवीसांना उद्देशून बोलले होते. मात्र त्यांच्या याच विधानाचा आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चांगला समाचार घेतला आहे. ‘ देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर पाठिंबा देऊ असं राज ठाकरे म्हणाले. तर त्यांनी चांगल्या कामाची यादी जाहीर करायला हवी होती काल. कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला,हे चांगलं काम आहे का?’ असा थेट सवाल राऊत यांनी राज ठाकरेंना विचारला.
मुंबईत मराठी माणसाची पिछेहाट सुरू आहे. राज्यातून उद्योग बाहेर चालले आहेत. त्यावर फडणवीस काहीच बोलत नाहीत हे चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जातंय मराठी संस्कृतीवर हल्ला होत आहे, हे चांगलं काम असेल तर फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे. पण ठिक आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
काय म्हणाले संजय राऊत ?
देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर पाठिंबा देऊ असं राज ठाकरे म्हणाले. तर त्यांनी चांगल्या कामाची यादी जाहीर करायला हवी होती काल. त्यांना कोणत्या चांगल्या कामाची फडणवीस यांच्याकडून अपेक्षा आहे. कुणाल कामराचा स्टुडिओ फोडला, गुन्हेगारांना पाठिशी घातलं हे चांगलं काम आहे का. मुंबईत मराठी माणसाची पिछेहाट सुरू आहे. राज्यातून उद्योग बाहेर चालले आहेत. त्यावर फडणवीस काहीच बोलत नाहीत हे चांगलं काम आहे का? मुंबईत मराठी माणसाला घर नाकारलं जातंय मराठी संस्कृतीवर हल्ला होत आहे, हे चांगलं काम असेल तर फडणवीस यांना पाठिंबा देणं राष्ट्राची गरज आहे, असं राऊत म्हणाले.
राज ठाकरे यांनी मनावर घेऊन कुणाच्या कानफटात मारायचं ठरवलं असेल तर त्यांचं स्वागत
औरंगजेबाबत त्याच्या कबरी संदर्भात आम्ही सातत्याने हीच भूमिका घेतली आहे, शिवाजी महाराजांसाठी आणि मराठा साम्राज्यासाठी ज्यांनी प्राणांची आहुती दिली. त्यांच्या शौर्याचं हे प्रतीक आहे. लोकसभेत त्यांची भूमिका वेगळी होती. भाजपच्या सोयीची होती. मराठी माणसा संदर्भात कानफटात आवाज काढायचं असेल तर काढलीच पाहिजे. कोणत्या पक्षाचा माणूस ही भूमिका मांडतोय या विषयी आमच्या मनात संदेह असणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी ज्या शिवसेनेची स्थापना केली मराठी माणसासाठी. भाजपने ज्या पद्धतीने मराठी माणसाचं संघटन तोडलं. हा मराठी माणसाच्या एकजुटीवरचा हल्ला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांनी मनावर घेऊन कुणाच्या कानफटात मारायचं ठरवलं असेल तर त्यांचं स्वागत आहे. आम्ही आहोतच, असंही राऊत म्हणाले.
महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये
बाळासाहेब ठाकरेंची शिवेसना फोडण्यामागे फडणवीस यांचा हात आहे. अमित शाह यांचा हात आहे. मोदींचा हात आहे. ही शिवसेना बाळसाहेबांनी मराठी माणसासाठी तयार केली. त्याची शकले करून व्यापाऱ्यांचा ताबा राहावा म्हणून जे राजकारण आहे. राज ठाकरे यांना त्यात पाठिंबा देऊ इच्छितात त्यात राजकारण आहे. आम्ही मराठी माणसाच्या पुनर्वसनासाठी आणि प्रगतीसाठी आम्ही काम करत आहोत. अशावेळी महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत होईल अशी भूमिका कोणी घेऊ नये, असं म्हणत राऊतांनी राज ठाकरेंना टोला हाणला.
देवेंद्र फडणवीस यांना चांगलं काम करायचं असेल. त्यांच्या मंत्रिमंडळात जे सदस्य आहे, त्याने कुणाल कामराला ठार मारण्याची धमकी दिली आहे. असा माणूस मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? दुसरा कोणी असता तर आतापर्यंत पोलीस त्याला घेऊन गेले असते आणि जीवे मारण्याच्या धमकीबद्दल त्याला मोक्का लावला असता. मंत्रिमंडळात असे काही लोकं आहेत ज्यांनी कुणाल कामराला टायरवर उलटा टांगून मारणं म्हणजे ठार मारणं, किंवा जिवंत कसा राहतो अशी भाषा करणं ही तुमच्या मंत्रिमंडळातील लोक करत आहेत आणि गृहमंत्री सहन करत आहेत, अशा शब्दांत राऊतांनी सुनावलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List