‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी भाषेपर्यंत अशी चौफेर फटकेबाजी त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं.
नेमकं काय म्हणाले राज ठाकरे?
तामिळनाडूत बघा. ते हिंदीला येऊ देत नाहीत. आपणच काही करत नाही. मी इतका भांबावलेला माणूस पाहिला नाही. सर्व त्या इन्स्टावर आहेत. कारण डान्सबार बंद आहेत. तिकडे हे चालायचं ते आता मोबाईलवर आलं आहे. कशात गुंतून पडले आहात. विचार तर करा. निवडणुका संपल्या. शिमगा झाला. होळी संपली. तुमच्या साक्षीने सांगतो. फडणवीस तुमच्या हातात एक चांगलं राज्य, सुसंस्कृत राज्य हातात आलं आहे. त्याकडे नीट बघा. चांगल्या पद्धतीने मराठी माणसाकडे पाहत असाल तर आमचा तुम्हाला निश्चित पाठिंबा राहील. पण प्रत्येक गोष्ट आमची ऐकून करा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आर्थिक असुरक्षितता आली आहे. वैचारिक असुरक्षितता आली आहे. मंदिराच्या बाहेर रांगा लागल्या आहेत. नवीन बुवा आले आहेत. लोक त्यांच्यात अडकून पडत आहेत. ठिक आहे चांगल्या गोष्टीत अडकत आहेत. महाराष्ट्राला विळखा बसला आहे. हमको मराठी नही आता, असं आम्हाला सांगतात. कानफटितच बसणार आहे. प्रत्येक राज्यात त्या त्या भाषेचा मराठीचा मान राखला पाहिजे. महाराष्ट्रात मराठीचा मान राखलाच पाहिजे. प्रत्येक अस्थापनात राखलाच पाहिजे. उद्यापासून कामाला लागा, महाराष्ट्रातील प्रत्येक बँकत मराठी वापरली जाते की नाही चेक करा. प्रत्येक बँकेत. प्रत्येक अस्थापनेत.
तुम्ही मराठी म्हणून कडवटपणे राहिला पाहिजे. या देशातील हिंदू हा हिंदू तेव्हाच होतो जेव्हा मुसलमान रस्त्यावर येतात. एरव्ही भक्ती भावाने असतात. पण हिंदूतील हिंदू जागृत होतो. तो फक्त दंगलीत हिंदू होतो. दंगल संपल्यावर तो पंजाबी गुजराती होतो. मग मराठी होतो तेव्हा साळी माळी मराठा ब्राह्मण कुणबी सगळं होतं. जातीबद्दल प्रेम असनं स्वाभाविक आहे. पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणं ही विकृती आहे, असं राज ठाकरे यांनी यावेळी म्हटलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List