औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवरील भाषणात राजकारण्यांना जोरदार फटकारे मारले. छत्रपती शिवाजी महाराज वारल्यानंतरही औरंगजेब महाराष्ट्रात का थांबला होता? कारण त्याला येथील विचार मारायचा होता. आम्हाला मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेबाला येथे मारला होता हे लोकांना दिसायला हवे. येथील औरंगजेबाची कबर आहे तिचे डिझाईन काढून टाका ती कबर उघडी ठेवा ती लोकांनी पाहायला हवी, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी म्हणाले. एवढ्या साम्राज्याचा बादशाहा केवळ अडीच तीन जिल्ह्याच्या राजाला संपवायला कसा आला याचा विचार करा असेही आवाहन राज ठाकरे यांनी केले.
जातीत भांडणे लावणाऱ्यांच्या नादी लागू नका
राज ठाकरे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या हिंद प्रांतावर केलेला संस्कार आहे. तो एक चमत्कार आहे. ती एक विलक्षण घटना आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा एक विचार आहे. तो विचार जन्माला यायच्या अगोदर. या हिंद प्रांताची काय अवस्था होती. सर्व जातीचे लोक कुणा ना कुणाकडे होते ना कामाला. शिवाजी महाराजांचे वडील आदिलशाहीतच होते ना ? त्यानंतर ते निजामशाहीत गेले ना. तो काळ वेगळा होता. परिस्थिती वेगळी होती. त्यांनी का असा निर्णय होते. जे कोणी राज्यातील संरजामदार होते त्यांच्या विरोधात महाराजांचा लढा होता. ते कोण होते. त्यांना जातीत का पाहता? अफजल खानाचा वकील कुलकर्णी होता. ब्राह्मण होता. अफजल खानाशी बोलणी करणारा शिवाजी महाराजांचा वकीलही ब्राह्मणच होता. तेव्हा वेगवेगळी माणसं एकमेकांकडे कामावर होती. इतिहासातील प्रत्येक गोष्ट कागदावर नाही. त्यावेळी काय निर्णय घेतले, काय परिस्थिती होती आपल्याला काय माहिती ? त्यामुळे तुम्ही जातीत भांडणे लावणाऱ्यांच्या नादी लागू नका असे आवाहन केले.
३०० ते ४०० वर्षापूर्वीचा इतिहास त्यावर आपण आज भांडतोय
३०० ते ४०० वर्षापूर्वीचा इतिहास त्यावर आपण आज भांडतोय जातीपातीत. आग्र्याच्या दरबारात महाराजांच्यासमोर संभाजी महाराज असताना. संभाजी महाराजांनी औरंगजेबाची पाच हजाराची मनसबदारी स्वीकारली आहे. शिवाजी महाराजांसमोर. महाराजांचा होकार असल्याशिवया होईल? पण दरबारात अडकलो. स्वीकारल्याशिवाय पर्याय नाही. आता स्वीकारू नंतर पाहू. राजकारण असतं ते. परिस्थिती काय आहे. कशा अंगाने इतिहास पाहायचा असतो हे आपण पाहणार की नाही. शिवाजी महाराजांकडे औरंगजेबाचा माणूस मिर्झा राजे जयसिंग आला ते हिंदू होता. तानाजी मालूमालुसरे यांचा लढाईत मृत्यू झाला. तो उदयभानासोबतच्या लढाईत ना ? तो राजपूत होता. हिंदू होता ना. आपण कोणत्या काळात जगतो. शिवाजी महाराजांच्या आधीचा काळ वेगळा होता. नंतरचा काळ होता असेही राज ठाकरे यावेळी म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List