…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

…तेथे बांधकाम सुरु होते त्यामुळे त्यांच्या हल्ल्याची धार वाढली, नागपूर पोलिसांनी सांगितला सगळा घटनाक्रम

नागपूर हे निसर्गाचे वरदान असणारे टुमदार शहर काल सुर्यास्तानंतर दगडफेक आणि जेसीबी वाहनांच्या धुराने अचानक वेढले. दोन्ही बाजूंनी जमावाने घोषणाबाजी सुरु केली आणि विटांचा जीवघेणा मारा सुरु झाला. पोलिसांना टार्गेटकरुन हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात तीसहून अधिक पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्याला पार्श्वभूमी होती ते काल सोमवारी निघालेल्या औरंगजेबा कबर हटविण्याचा मागणी करणाऱ्या मोर्चाची…नागपूराचा महाल परिसरात गल्ली बोळातून आणि इमारतीच्या गच्चीवरुन दगड एखाद्या बॉम्बगोळ्या प्रमाणे अंगावर पडत होते आणि पाहाता पाहाता दगड विटांनी रस्ता भरला..या अचानक झालेल्या हल्ल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तर पोलिसांची सावधानता कुठेतरी कमी पडल्याचेही जाणवत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नागपूरातील महाल परिसरातील दोन गटात कालच्या मोर्चानंतर अफवा पसरुन दोन गटात तुंबळ राडा झाला. या हल्ल्यात घटनास्थळी मदतीसाठी धावलेले पोलीस कर्मचारी लक्ष्य ठरले. अंगावर अचानक दगडांचा मारा झाल्याने अनेक पोलीस रक्तबंबाळ झाले. या हल्ल्यात कुऱ्हाडीचा घाव हातावर झेलूनही डीसीपी निकेतन कदम यांनी आपल्या टीमला रेक्स्यु केले. त्यांच्या धाडसाचे कौतूक होत आहे. नागपूर पोलिसांनी एकत्र येऊन काल कायदा आणि सुव्यवस्था राखली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली विचारपूस केल्याने पोलिसांची धैर्य आणखी वाढल्याचे डीसीपी कदम यांनी सांगितले. आमच्याकडे सर्व सीसीटीव्ही फुटेज आहेत.त्याच्याआधारे आम्ही समाजकंटकांना शोधून काढू असे डीसीपी निकेतन कदम यांनी सांगितले.

कालच्या घटनेत मला सुरुवातीला दगडांमुळे पायाला जखम झाली. मात्र परिस्थिती बिकट असल्याने माझे जखमेकडे लक्ष नव्हते. परंतू जेव्हा आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळविल्यानंतर थोड्या वेळाने मला झालेल्या जखमेतून वेदना होऊ लागल्याचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक म्हणाले. आपल्याला डॉक्टरांनी तपासल्यानंतर शस्रक्रियेची काहीही गरज नसल्याचे म्हटलेय.. मात्र डॉक्टरांनी आराम करण्यास सांगितल्याचेही त्यांनी सांगितले.

परिस्थिती आता संपूर्णपणे नियंत्रणात

हा हल्ला ठरवून केलेला असू शकतो. शक्यता नाकारता येत नाही. त्याठिकाणी एक बांधकाम सुरु होते.त्याच्या ठिकाणच्या सिमेंटच्या विटा हल्लेखोरांनी पोलिसांवर फेकल्या. त्यांचा आकार मोठा असल्यामुळे हे दगड वेगाने अंगावर येत होते. त्यामुळे आपल्या पायाला जखम झाल्याचे पोलिस उपायुक्त अर्चित चांडक यांनी सांगितले. सर्वांना हेच आव्हान आहे की त्यांनी शांतता ठेवावी आणि पोलिसांना सहकार्य करावे. मुख्यमंत्री साहेब पोलिसांच्या बाजूने आणि सोबत नेहमी राहतात आणि आम्हाला मार्गदर्शन करतात. आम्ही खाकी वर्दी घातलेली असल्याने आमचे कर्तव्य कायदा सुव्यवस्थे राखणे हे आहे. मुख्यमंत्र्यांचे कदम यांच्याशी मोबाईलवरुन बोलणे झाले असल्याचे नागपूरचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी सांगितले.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास जळगावच्या चोपडा एसटी बसस्थानकात गुजरात पॅटर्न, बसपोर्टच्या धर्तीवर विकास
राज्यातील एसटी स्थानकांचा बीओटी ( बांधा वापरा आणि हस्तांतरित करा) तत्वावर विकास करण्यात येणार आहे. यासाठी लवकरच निविदा काढण्यात येणार...
Boat Drowned – भाविकांची धरणात बोट बुडाली; 7 भाविक बेपत्ता, 8 जणांना सुखरुप वाचवले
हजारो लोकं अश्रू ढाळताहेत…! बिल्डरांकडून होणाऱ्या फसवणुकीवर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
तेव्हा एकनाथ शिंदे मोदींच्या डस्टबिनमध्ये होते; उद्धव ठाकरे यांचा सणसणीत टोला
मुख्यमंत्री म्हणाले नागपूर दंगल पूर्वनियोजित; सोशल मीडियावर ‘चल दंगल समजून घेऊ’ कविता पुन्हा चर्चेत
Buldhana News – पाडकाम करताना घर अंगावर कोसळलं, बापलेकाचा दुर्दैवी मृत्यू
गुहागरच्या खरे-ढेरे-भोसले महाविद्यालयात बोगस प्रवेश अन् करोडोंचा गैरव्यवहार, भास्कर जाधव यांचा खळबळजनक आरोप