फिट राहण्यासाठी मोड आलेले कडधान्य खाताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा अन्यथा होईल नुकसान
प्रत्येकजण निरोगी राहण्यासाठी आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करतात. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे आपण आपल्या आहाराकडे योग्य लक्ष देत नाही यासाठी तंदुरस्त राहण्यासाठी काहीजण त्यांच्या आहारात मोड आलेले कडधान्य समाविष्ट करतात. तसेच आरोग्य तज्ञांच्या मते मोड आलेले कडधान्य हे पौष्टिकतेचे एक पावर हाऊस आहे. यांच्या सेवनाने आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात. मात्र हे मोड आलेले कडधान्य खाण्याची योग्य पद्धत माहित नसल्याने अनेकांना याच्या सेवनाचे फायदे मिळतच नाहीत. म्हणून तुम्हाला जर मोड आलेले कडधान्यांचे फायदे मिळवायचे असतील तर तुम्हाला खाण्याची योग्य पद्धत माहित असणे आवश्यक आहे. आता प्रश्न असा आहे की मोड आलेले कडधान्य खाण्याची योग्य पद्धत कोणती? यामध्ये कोणते पोषक घटक असतात? आणि हे खाण्याचे काय फायदे आहेत? चला तर मग जाणून घेऊयात…
मोड आलेल्या कडधान्यांमध्ये या पोषक घटकांचा समावेश
आहारतज्ज्ञांच्या मते मोड आलेल्या कडधान्यांमध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे एकूण आरोग्यासाठी आवश्यक मानले जातात. त्यात जीवनसत्त्वे अ, ब, क आणि ई सारख्या पोषक तत्वांचा समावेश आहे, तर त्यात कॅल्शियम, लोह आणि मॅग्नेशियम देखील मोठ्या प्रमाणात असते. जे वजन कमी करण्यास उपयुक्त ठरते.
मोड आलेले कडधान्य खाण्याचे फायदे?
आहारतज्ज्ञांच्या मते मोड आलेले कडधान्यांमधील पोषक घटक केवळ शरीराला बळकटी देत नाहीत तर विविध अवयवांच्या कार्यातही योगदान देतात. तसेच तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. त्याचबरोबर याच्या सेवनाने तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉल देखील नियंत्रित करतात आणि डोळे निरोगी ठेवण्यास मदत करतात. याशिवाय वजन कमी करण्यासाठी तुमच्या आहारात मोड आलेले कडधान्यांचा समावेश करा. या कडधान्यांचे सेवन करून पोट आणि केसांशी संबंधित समस्या देखील दूर करू शकतात.
मोड आलेले कडधान्य खाण्याची योग्य पद्धत?
तज्ञांच्या मते, प्रत्येकाची मोड आलेले कडधान्य खाण्याची स्वतःची पद्धत असते. तथापि बहुतेक लोकांना ते कच्चे खायला आवडतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की ही पद्धत पूर्णपणे चुकीची आहे. अलिकडच्या संशोधनात असे आढळून आले आहे की कच्चे मोड आलेले कडधान्य खाणे हे एक धोकादायक आहे. कारण कच्चे मोड आलेले कडधान्य खाल्ल्याने आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते, म्हणून तुम्ही हे मोड आलेले कडधान्य शिजवुन खावे.
यासाठी मोड आलेले कडधान्य मिठाच्या पाण्यात 5 मिनिटे उकळवा आणि नंतर याचे सेवन करा.
एका पॅनमध्ये थोडे तेल घाला आणि ते गरम झाल्यावर त्यात मोड आलेले कडधान्य टाकून त्यात मीठ मिक्स करा. 5 मिनिटांनी गॅस बंद करा आणि त्याचे सेवन करा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List