तुळजाभवानी मंदिरात गुढीपाडवा उत्साहात साजरा; भाविकांची दर्शनासाठी गर्दी
साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुडीपाडव्याच्या दिवशी पहाटे 5 वाजता श्री तुळजाभवानी मंदिर येथे गुढी उभारण्यात आली. दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे पहाटे देवीची चरणतीर्थ पूजा झाल्यानंतर मंदिराच्या शिखरावर गुढी उभारून गुढीपाडवा साजरा करण्यात आला. त्यानंतर तुळजाभवानी मातेची अलंकार महापूजा करण्यात आली. तसेच रात्री छबिना उत्सव होणार आहे.
रविवारी मंदिरात पाडवा वाचन देखील होणार आहे. त्यात वर्षभराच्या धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन सांगितले जाईल. मंदिर प्रशासनातर्फे नववर्षाच्या सर्व भाविक भक्तांना शुभेच्छा देऊन नवीन वर्ष सर्वांना सुखासमाधानाचे व भरभराटीचे जावो ही प्रार्थना भवानी मातेच्या चरणी करण्यात आली. यावेळी मंदिर संस्थानचे सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) अमोल भोसले, महंत तुकोजीबुवा, वाकोजी बुवा, सेवेकरी चोपदार, छत्रे व पवेकर यांचे प्रतिनिधी तसेच मंदिर संस्थान चे अन्य कर्मचारी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List