मोबाईल चोर भिवंडीत…, अभिनेत्याचा 2 लाखांचा फोन चोरी, ‘तो’ फोटो पोस्ट करत म्हणाला…
मोबाईल म्हटलं की आजच्या दिवसांतील सर्वात महत्त्वाची गोष्ट… अशात मोबाईल चोरीच्या घटना देखील मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. गर्दीच्या ठिकाणी सर्व प्रकारचे लोकं असतात. कुणी कामात असल्याने घाईत असतात. वर्दळ अधिक असलेल्या ठिकाणी चोरीच्या घटना सर्रास घडत असतात. अशात अभिनेता संकेत कोर्लेकर याचा मोबाईलची देखील चोरी झाली आहे. अभिनेत्याने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत मोठी माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वी रिक्षेतून अभिनेत्याचा फोन हिसकावण्यात आला. याची माहिती देखील संकेतने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. ल्या महिन्यातच त्याने आयफोन 16 प्रो मॅक्स 1 लाख 70 हजारांचा फोन खरेदी केला होता आणि 16 मार्च रोजी त्याचा फोन चोरीस जाण्याची घटना घडली.
अशात आयफोन असल्यामुळे मोबाइलमध्ये असणाऱ्या ट्रॅकिंग सिस्टिमवरुन त्याचा फोन भिवंडीत असल्याचं अभिनेत्याला कळलं आहे. याबद्दल इन्स्टाग्राम स्टोरीवर एक फोटो शेअर करत अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा तुम्हाला समोर दिसत आहे मोबाईल चोर भिवंडीत आहे. पण दोन आठवडे झाल्यानंतर देखील फोन तुमच्या हातात नाही… ही भावनाच फार कठीण आहे. मला पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे.’
‘पोलीस गुन्हेगारांचा शोध घेणार. माझ्या मोबाइलसहीत अजून बऱ्याच जणांचे मोबाईल मिळू दे आणि ती इतकी वर्ष मोकाट चोरीमारी करणारी टोळी मुळातून नष्ट होउदे हीच प्रार्थना.’ असं देखील संकेत पोस्टमध्ये म्हणाला आहे.
एवढंच नाही तर, नवीन फोन चोरीला गेल्यामुळे अभिनेता खंत व्यक्त करत म्हणाला, ‘दोन लाखांचा फक्त एक महिना वापरलेला फोन अचानक दुसरा हिसकावून घेऊन जातो. याहून वाईट काय? काळजी घ्या… जग बदलत आहे…’ सध्या सर्वत्र संकेत याच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
संकेत याच्याबद्दल सांगायचं झालं तर, सोशल मीडियावर त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. चाहत्यांना देखील संकेतचे व्हिडीओ आवडतात. Korlekarmania या नावाने त्याचे युट्यूब चॅनेल देखील आहे. त्याला युट्यूबचं सिल्व्हर बटणदेखील मिळालं आहे.
संकेत याने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये देखील काम केलं आहे. ‘अजूनही बरसात आहे’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकांमध्ये संकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसला. तर ‘टकाटक’ सिनेमामुळे त्याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List