केस कापत रस्त्यावर उतरल्या आशा सेविका, सरकारला धरले धारेवर; काय आहे प्रकरण?
केरळमधील आशा सेविका गेल्या 50 दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. मात्र सरकारवर आपल्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप आंदोलक आशा सेविकांनी केला आहे. याचा निषेध करण्यासाठी त्यांनी आपले केस कापले आणि काही अशा सेविकांनी आपले मुंडणही केले. या आंदोलनादरम्यान, एका अशा सेविकेने आपले कापलेले केस हातात धरले आणि रडत म्हणाली की, “हे आमचे आयुष्य कापले जात आहे. आमचा निषेध त्या मंत्र्यांविरुद्ध आहे जे आमच्या वेदना आणि समस्यांकडे डोळेझाक करतात. दररोजच्या 232 रुपयांच्या तुटपुंज्या उत्पन्नावर आम्ही कसं जगायचं?”
काय रहाते आशा सेविकांच्या मागण्या?
केरळमधील आशा सेविका त्यांच्या वेतनवाढीसाठी आंदोलन करत आहेत. आशा सेविकांनी त्यांचे मानधन 7000 रुपयांवरून 21000 रुपये करण्याची मागणी करत आहेत. यासोबतच आशा कामगारांची मागणी आहे की, वयाच्या 62 व्या वर्षी निवृत्तीनंतर त्यांना 5 लाख रुपये एकरकमी देण्यात यावे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List