बरौनी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग; आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू
मध्य प्रदेशात धावत्या बरौनी एक्सप्रेसच्या पार्सल बोगीला आग लागल्याची घटना सोमवारी घडली. नर्मदापुरमजवळ सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास एक्सप्रेसच्या मागच्या डब्याला आग लागली. बरौनी एक्सप्रेस अहमदाबादहून बरौनीला चालली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सामान असलेल्या सर्वात मागच्या बोगी आणि जनरेटरला आग लागली. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून रेल्वे कर्मचाऱ्यांनी हा डबा ट्रेनपासून वेगळा केला. आगीची माहिती मिळताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सदर डबा तात्काळ ट्रेनपासून वेगळा केला. कर्मचाऱ्यांनी सुमारे सव्वा तास आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र अद्याप आग पूर्णपणे विझली नाही.
घटनास्थळी रेल्वे कर्मचारी, अग्नीशमन दल, स्थानिक पोलीस आणि आरपीएफचे पथक उपस्थित आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List