वैष्णोदेवी मंदिर परिसरात ऑरीने असं काय केलं? त्याच्यासह 8 जणांवर FIR दाखल
Orry Booked For Consuming Alcohol: बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास मित्र आणि सोशल मीडिया इंफ्लुएंसर ऑरी याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. ऑरीच्या विरोधात जम्मू येथील कटरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ओरी याच्यावर डीएमच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि जम्मूतील कटरा येथील एका 5 स्टार हॉटेलमध्ये मित्रांसोबत दारू पिण्याचा आरोप आहे. 5 स्टार हॉटेलमध्ये दारू पिताना त्याचा फोटो व्हायरल होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी ऑरी त्याच्या 8 मित्रांसोबत माता वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जम्मू याठिकाणी गेले होते. याच दरम्यान, कटरा येथील एका 5 स्टार हॉटेलमध्ये थांबवे होते. हॉटेलमध्ये दारू आणि नॉनव्हेजवर बंदी असून देखील दारूचं सेवन केलं. ज्यामुळे ऑरी आणि त्याच्या मित्रांवर 15 मार्च रोजी एफआयआर दाखल करण्यात आली आहे.
ऑरी सोबत त्याचे 8 मित्र दर्शन सिंग, पार्थ रैना, हृतिक सिंग, राशि दत्ता, रक्षिता भोगल, शगुन कोहली आणि सुश्री अनास्तासिला अरझामस्कीना यांचाही या प्रकरणात सहभाग आहे. सर्वांना सांगण्यात आलं होतं की, कॉटेज सूटमध्ये मद्य आणि मांसाहाराला परवानगी नाही, कारण अशा दिव्य माता वैष्णोदेवी तीर्थक्षेत्रात असं करण्यास सक्त मनाई आहे. असे असतानाही ओरीने मित्रांसोबत बसून दारू प्यायली.
एसएसपी रियासी परमवीर सिंह यांनी गुन्हेगारांना अटक करण्याच्या कठोर सूचना दिल्या आहेत जेणेकरून धार्मिक स्थळांवर ड्रग्ज किंवा दारू यासारख्या गोष्टी खपवून न घेण्याचे उदाहरण मांडता येईल. शिवाय यामुळे भक्तांच्या धार्मिक भावनेला देखील ठेच पोहचली आहे. देशाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आणि श्रद्धेशी संबंधित लोकांच्या भावनांचा आदर न करणाऱ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी एसपी कटरा, डीएसपी कटरा आणि एसएचओ कटरा यांच्या देखरेखीखाली एक टीमही तयार करण्यात आली आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List