केस मजबूत आणि जाड होतील, फक्त ‘या’ नैसर्गिक घटकांपासून बनवा हेअर टोनर

केस मजबूत आणि जाड होतील, फक्त ‘या’ नैसर्गिक घटकांपासून बनवा हेअर टोनर

वातावरणातील बदल वाढते प्रदुषण तसेच ताणतणाव आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे केस गळणे या समस्या सामान्य झाल्या आहेत. प्रदूषण आणि हवामानातील बदलांचा आपल्या केसांवरही परिणाम होतो. यामुळे आपले केस कोरडे आणि फ्रिजी दिसू लागतात. अशा परिस्थितीत ज्यांचे केस आधीच कुरळे आहेत त्यांच्यासाठी या समस्या आणखी वाढते. त्या लोकांना केसांची काळजी घेणे थोडे कठीण होते.

केस मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी अनेक घरगुती उपायांचा अवलंब केला जाऊ शकतो. अनेकांना हेअर मास्क लावण्यासाठी वेळ मिळत नाही. त्यावेळी नैसर्गिक घटकांपासून हेअर टोनर बनवू तुम्ही तुमचे केस मऊ आणि निरोगी ठेऊ शकतात. तर या गोष्टी वापरून तुम्ही घरी केसांसाठी टोनर बनवू शकता.

तुळस आणि कडुलिंबाच्या पानांचा टोनर

तुळस आणि कडुलिंब दोन्हीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म भरपूर असतात. त्यांच्यामधील हे गुणधर्म केस निरोगी ठेवतात आणि डोक्यातील कोंडा आणि खाज येणे यासारख्या टाळूच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. तुम्ही या दोन्हीपासून हेअर टोनर बनवू शकता. यासाठी तुम्हाला 10-12 तुळशीची पाने, 10-12 कडुलिंबाची पाने आणि 1 कप पाणी घ्या. आता 1 कप पाण्यात तुळस आणि कडुलिंबाची उकळा. उकळल्यानंतर हे मिश्रण थंड होऊ द्या आणि नंतर ते गाळून स्प्रे बाटलीत भरा. तयार झालेले टोनर टाळूवर लावा आणि 15-20 मिनिटे तसेच राहू द्या आणि त्यानंतर केस स्वच्छ धुवा.

कोरफड जेल टोनर

कोरफड केसांसाठी एक उत्तम टोनर आहे. त्यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे तुमच्या स्कॅल्पला आराम देण्यास आणि केसांची मुळे मजबूत करण्यास मदत करू शकतात. तसेच कोरफड केसांना हायड्रेट करण्यास आणि सिल्की करतात. याकरीता केसांसाठी कोरफडीचा टोनर बनवा. यासाठी तुम्हाला 2 चमचे ताजे कोरफड जेल आणि 1 कप पाणी लागेल. ताजे कोरफडीचे जेल पाण्यात चांगले मिसळा. ते एका स्प्रे बाटलीत भरा आणि केसांना लावा आणि 10-15 मिनिटांनी केस धुवा.

हर्बल टोनर

तुम्ही केसांच्या चांगल्या आरोग्यासाठी अनेक गोष्टी मिसळून हर्बल टोनर बनवू शकता. हे बनवण्यासाठी तुम्हाला 2 चमचे रोझमेरी, 10 ते 15 कढीपत्ता, 2 चमचे मेथीचे दाणे, 4 ते 5 लवंगा, 1 चमचा निगेला बियाणे, 1 इंच आल्याचा तुकडा आणि गरजेनुसार पाणी घ्या. आता हे हर्बल टोनर बनवण्यासाठी, एका पॅनमध्ये 1 ग्लास पाणी गरम करा, आता त्यात सुक्या रोझमेरी, कढीपत्ता, मेथीचे दाणे, निगेला बियाणे, लवंगा आणि किसलेले आले घाला आणि काही वेळ उकळवा. यानंतर पाणी थंड होऊ द्या आणि स्प्रे बाटलीत ठेवा. केस धुण्यापूर्वी हे लावा.

हेअर टोनर लावण्यापूर्वी, लक्षात ठेवा की जर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीची ऍलर्जी असेल तर ते वापरू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

IMD rain forecast : महाराष्ट्रावर मुसळधार पावसासह आणखी एक संकट; पुढील 48 तास धोक्याचे, आयएमडीचा मोठा अलर्ट IMD rain forecast : महाराष्ट्रावर मुसळधार पावसासह आणखी एक संकट; पुढील 48 तास धोक्याचे, आयएमडीचा मोठा अलर्ट
देशासह राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा सुरूच आहे, अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून, ऐन हाता तोंडाशी आलेला घास निसर्गानं...
…म्हणून वाल्मिकच्या एन्काउंटरची सुपारी दिली असेल, करुणा शर्मांचा खळबळजनक आरोप
आई वेश्या, शाळेचं तोंडही पाहिलं नाही; नशीबाची साथ अन् बनली बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री
कोमट पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत चमत्कारिक फायदे, दुसरा फायदा तर प्रत्येकासाठी फारच महत्त्वाचा!
तुम्हीदेखील PCOS प्राॅब्लेमने त्रस्त आहात का! मग हे पदार्थ खाणे टाळावे
IPL 2025 – “मला आणखी एक संधी द्या…” संघर्षावर स्वार होऊन करुण नायरच दमदार पुनरागमन, वाचा त्याचा थक्क करणारा प्रवास
गुजरातमध्ये 1800 कोटी रुपयांचे 300 किलो ड्रग्ज जप्त, ATS आणि तटरक्षक दलाला मोठं यश